मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र २६

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र २६

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


शर्करेची मधुरता । कां चंदनाची सुंगधता । स्वाभाविकपणें दिसे नांदतां । नाहीं कृत्रिम त्याठायीं ॥२७८॥
तैसी भक्ति प्रेमरूप । प्रेम तेंचि सुखरूप । परब्रम्ह स्वरूपें अरूप । रूपा आली ॥२७९॥
कर्मज्ञान आणि योग । हीं तिन्हीं साधनें अव्यंग । आत्मस्थिति साधावया चांग । ग्रंथाधारें निरूपलीं ॥२८०॥
येर्‍हवीं तरी कर्मजड । ज्ञानही बोलिलें अवघड । योग मार्गाची धडपड । नये सुखाकारणें ॥२८१॥
कर्मीं साधेल ब्रह्मार्पण । ज्ञानीं अनुभवाची खूण । योगीं निष्काम होईल मन । तरीच संतोष साधका ॥२८२॥
या तिहांची सार्थकता । व्हावया भक्तिच मुख्यता । तियेवीण विफलता । सत्य बोलिलीं सर्वार्थीं ॥२८३॥
पक्वान्नें जरीं झालीं बहुत । तरी शर्करेविण चवी न येत । न्यून पडतां किचिंत । तोंड फिरविती सर्वही ॥२८४॥
तैसें कर्मयोग ज्ञानमार्ग । यांसी भक्तिविणें नव्हे लाग । भक्ति उपजतां सर्व सांग । फलरूप सर्व तिचेनि ॥२८५॥
म्हणोनि भक्तिच फलरूप शाखापल्लवें वाढलीं अमूप । तक्रमंथनी निवडलें तूप । तेंचि सार बोलिले ॥२८६॥
शाखापत्रें बहुत येती । परि फल न दावितां विफल होतीं । भक्तिज्ञानयोगाची स्थिति । तयापरि जाणावी ॥२८७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP