मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्री कबीर चरित्र २

श्री कबीर चरित्र २

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


भाग पहिला
तें ऐकून बाई म्हणाली, “ वाणीदादा ! हें तुझें चुकतें आहे. ”

॥ लावणी ॥
नाहीं नाद स्त्रियांचा बरा, समज चातुरा, शास्त्रें सांगत
आलीं आजवरी । तयांला बसविं न धाब्यावरी ॥
राजा रावण लंकापती, असुन सन्मती, जानकी चोरून
जयीं आणिली । शेवटीं ना धडगत रे लागली ॥
( चाल ) गेला मरुन भस्मासुर, सांगुं कुठवर ॥ मोहनी काळ झाली ॥
यापरी सुरांचा पती, इंद्र जैं म्हणती, भगें त्या पडलीं ॥
रोहिणी चंद्रमा झाला, डाग लागला, क्षयि तो झाला
नभमंडळीं । कीचक ऐसाच पडला बळी ॥
गणुदास म्हणे अंतरीं, समज ती धरी, पराव्याची नार
विषाची सुरी । वार ती करिल तुझ्या अंतरीं ॥२०॥

॥ आर्या ॥
परि नच मानी वाणी वचन जरी सत्य सुखद साचार ।
मृत्यू समीप ज्याचा त्यासी काढा कुठून पटणार ? ॥२१॥

॥ पद ॥ ( हो प्रगट झणी )
नको सांगूं गोष्टि शास्त्रिंच्या मला आज कांहीं ।
गप्पानें भरलें तें सार तयांमध्यें नाहीं ॥
गमविं ना वृथा हा वेळ सांगतों पाहीं ।
करि मान्य मदिय वचनासी शिधा मग नेईं ॥२२॥

॥ श्लोक ( शार्दूल विक्रीडित ) ॥
वणिजवचन ऐसें झोंबलें त्या सतीसी ।
परि नच वदवे त्या एकही शब्द त्यासी ।
धनिकजन धनानें मत्त होवोनि जाती ।
विनय शुचिपथाला ना कदां मान देती ॥२३॥

॥ लावणी ॥
जरि नच केलें मान्य वचन हें हा न शिधा दे खरा ।
भक्त तुझे भो ! परतुन जातिल येउनी आमुच्या घरा ॥
तनु मातीची मातिंत जाइल उपयोगाचि न जरा ।
तद्विक्रय मी करितें आजीं कोपुं नको ईश्वरा ।
समजुन उमजुन अनीति घडते संतांस्तव श्रीवरा ।
ऐसें बोलुन द्वयकर जोडी, कवन सिनेच्या तिरा ॥२४॥

॥ आर्या ॥
होय म्हणे मानेनें शब्द सतीच्या न ये मुखामधुनी ।
तें पाहुन परमात्मा खळखळ गाळीत लोचनीं पाणी ॥२६॥

॥ ओवी ॥
कणीक, तांदूळ, लवण । डाळ, तूप, गूळ जाण ॥
ऐसें सामान घेऊन । पातली साध्वी मंदिरा ॥२७॥

॥ दिंडी ॥
शिधा संतां देऊन भोजनाला । सती बाही एकांतीं कबीराला ॥
चरण वंदुनि वृत्तांत कथन केला । देह विकिला मीं आज वाणियाला ॥
तें ऐकून कबीर म्हणालें,

॥ साकी ॥
सब कुछ अच्छा किया तुने ये सुन सुन मेरे प्यारी ।
संतन खातर जान बिकाई रामचरण बलहारी ॥
वाकू नितस्मरणा । सत्त्व कबू न गमाना ॥२९॥
तूं आपलें सत्त्व राखलेंस. आतां बोलल्याप्रमाणें त्या वाण्याकडे जा. पण सध्यां पाऊस पडतो आहे. ”

॥ श्लोक ॥
प्रचुरतर तमानें धुंद झाल्या दिशाही ।
चम चम चम चपला त्या लवे ठायिं ठायिं ॥
गड गड गड ऐसा शब्द गंभीर होई ।
वर्षहि जलधारा जीवना पार नाहीं ॥३०॥
तेव्हां अशा स्थितींत --

॥ आर्या ॥
घेउन कांता स्कंधीं भक्तशिरोमणि कबीर करि गमना ।
पाहुन सत्त्व तयाचें मनिं द्रवला रामचंद्र रघुराणा ॥३२॥

॥ ओवी ॥
वाणीयाचे घरापाशीं । सोडी कबीर कांतेसी ॥
आनंदानें आगरासी । येता झाला आपुल्या ॥३३॥

॥ श्लोक ॥
आनंदला वणिज पाहुन त्या सतीला ।
जैसा शिशू निजकरीं धरि सोमलाला ॥
प्राणान्त दीप करितो परिही पतंग ।
होऊन मत्त झटतो करण्यास संग ॥३४॥

॥ आर्या ॥
पद न तुझे पंकानें कां भिजले सत्वरीं मला सांगें ।
साध्वि म्हणे हे साधो मम पतिनें आणिलें मला अंगें ॥३५॥
हें ऐकून वाण्याला फ़ारच आनंद झाला. त्याला तिच्या नवर्‍याची जी भीति वाटत होती तीही नाहींशी झाली. इकडे -

॥ साकी ॥
धनुसबाण सब फ़ेक दिया समशेर हातमो भाला ।
कोतवाल बने रामचंद्र प्रभु शरयूनदितटवाला ॥३६॥
वाण्यानें दाराला कडी लावल्याबरोबर भगवान् रामचंद्रानें त्या काशीच्या कोतवालाचें सोग घेतलें व हातांत भाला घेऊन दरडावून बोलण्यास सुरुवात केली; व जोरानें दारावर लाथ मारली. त्यासरशी दार मोडलें गेलें. कोतवाल्ररूपी परमेश्वर आंत आले व त्या वाण्याला म्हणाले,

॥ झंपा ॥
किती नष्ट तूं दुष्ट रे अससि वणिजा ।
भोगण्या इच्छिसी भक्तभाजा ॥ध्रु०॥
मदिय भगिनी असे, सन्मती ती खरी ।
वर्तनें शुद्ध ती जेवि गोदा ॥१॥
लक्ष्मीच्या मदें मत्त होऊनि तूं ।
दूषवीसी सती काय अंधा ॥३७॥

॥ साकी ॥
नहीं गुन्हा है ये बनियेका सुनो सुनो ये अरजी ।
मोल दिया है इन्ने मुझकू खपा न करना मरजी ॥
इनकू मत मारो । कुतुवाल ! धनिक ये मेरो ॥३८॥
“ बाण्याचा अपराध नाहीं. त्यांनीं मला आज रात्रीच्या बोलीनें विकत घेतलें आहे. ” श्रीरामचंद्रप्रभूंनीं तें ऐकलें नाहीं.
इकडे श्रीज्ञानेश्वरादि संत मंडळीं कबिराला घेऊन त्या वाण्याच्या घरीं आली व कोतवालाला साष्टांग नमस्कार घालती झाली. श्रीनिवृत्तिनाथांनीं विनंति केली कीं, “ रामा ! हा कोतवालाचा वेष टाकून आतां प्रगट व्हा. ” त्याप्रमाणें राम प्रगट झाले. सर्वांनीं मिळून प्रभूची मंगल आरती केली.

॥ पद ॥ ( कामदा )
जयजयाजी हे दशरथात्मजा ! । जयजयाजी हे राघवा अजा ! ॥
जयजयाजी हे रावणांतका ! । जयजयाजी हे भक्तरक्षका ! ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP