सामान्यजपनियमा:

प्रस्तुत ग्रंथात मंत्र, व्याख्यान, मराठी अर्थ आणि मंत्रविधान एकत्र मिळाल्याने जिज्ञासूंची तृप्ती पूर्ण होईल असा विश्वास आहे.


तत्र वाचिकोपांशुमानसैर्जपस्त्रिधा । मंत्रस्य स्फुटाक्षरपदमुच्चारणं वाचिक: । किंचिदस्फुटाक्षरपदं उपांशु: । मनसा कृत: मानस: । तदुक्तं - धियायदक्षरश्रेण्यास्ततत्तदर्थविचारणम्‌ । मानसस्तु जप: प्रोक्तो योगसिद्धिप्रदायक: ॥ इति । अत्र उत्तरोत्तराणां ज्यायस्त्वं यत्तु नोच्चैर्जपं बुध: कुर्यादिति शंकवचनं, तन्न वाचिकजपनिषेधार्थं किंतु मानसादिजपप्रशंसार्थं इति चंद्रिका ।
अल्पफलपरं इति पृथ्वीचंद्र: इति आचाररत्ने । तत्र विशेषमाह योगियाज्ञवल्क्य :--- न च क्रमन्‌ न विहसन्‌ न पार्श्वमवलोकयन्‌ । नापाश्चितो न जल्पंश्च न प्रावृतशिरस्तथा । उष्णीषी कंचुकी नग्नो मुक्तकेशो गलावृत: । अपवित्रकरोऽशुद्ध: प्रलपन्न जपेत्व्कचित्‌ ॥ प्रसार्य पादौ न जपेत्‌ कुक्वुटासन एव च । गतासन: शयानो वा
रथ्यायां शूद्रसंनिधौ । रिक्तभूम्यां च खट्वां च न जपेज्जापक: स्वयम्‌ । आसनस्थो जपेत्सम्यङ मंत्रार्थगतमानस: । क्रोधो मद: क्षुधा तंद्रा निष्ठीवनविजृंभणे । श्व-नीचदर्शनं निद्रा प्रलापश्च जपद्विष: ॥ एतेषां संभवे वापि कुर्यात्सूर्यादिदर्शनम‌ । आचम्य वा जपेच्छेषं कृत्वा वा प्राणसंयमम्‌ । जपं कुर्वन्यदि ष्ठीवेत्क्षुवते जृंभतेऽपि वा । आचामेद्भुवि
न्यस्ताक्ष: स्पृशेदम्भोथ गोमयम्‌ ॥ इति । अन्यच्च यामलेविण्मूत्रोत्सर्गशंकादियुक्त: कर्म करोति य: । जपार्चनादिकं सर्वमपवित्रं भवेत्प्रिये ॥
मलिनांबरवस्त्रादिमुखदुर्गंधिसंयुत: । यो जपेत्तं दहत्याशु देवता गुप्तसंस्थिता । जपमध्ये - मलमूत्रोत्सर्गे कर्तव्ये मालांसमाप्य त्वरा चेत्‌ मालावृत्तिं परित्यज्य कुर्यात्‌, तत:
कूर्परपर्यंतं हस्तौ पादौ प्रक्षाल्य आचम्य प्रणानायम्य षडंगेन शुद्धिं कृत्वा जपेत्‌ । मलोत्सर्गे तु स्नानं कृत्वैवाचमनादि कार्यम्‌ ॥
क्षुतादिनिमित्ते समीपे उदकाभावे वा श्रोत्राचमनमीरितम्‌ । सूर्यादिदेवतादर्शनं च । सौभाग्यकल्पद्रुमादावप्येवमेव ।’ विप्रस्य दक्षिणे कर्णे सन्ति तीर्थानि देवता: ।’ इत्युक्ते: दक्षिणकर्णस्पर्श: कार्य: ।
तंत्रांतरेविशेष :--- ‘रथ्यायामशिवस्थाने न जपेत्तिमिरांतरे । उपानद्नू्ढपादो वा यानशय्यागतस्तथा ॥’


जपसामान्यधर्म सांगतों. :--- वाचिक, उपांशु आणि मानस असा जप तीन प्रकारचा आहे. मंत्राचीं पदपदाक्षरें स्पष्ट म्हणणें हा वाचिक, अस्पष्टोच्चार किंचित्‌ ओष्ठसंचलन करणें हा उपांशु, आणि केवळ मनांत - बुद्धीनें मंत्राक्षरें मंत्रार्थ लक्षांत घेऊन जप करणें हा मानसिक, मानस जप सर्वांत श्रेष्ठा, उपांशु मध्यम, वाचिक कनिष्ठ, मोठयानें जप करूं नये हें जें शंखवचन आहे. त्याचा अभिप्राय वाचिक जपाचा निषेध करणें हा नसून मानस व उपांशु जप यांची प्रशंसा करणें इतकाच आहे, असें चंद्रिकेंत आहे. मानस जपापेक्षां वाचिकाचें फल कमी हें सांगणें हा अभिप्राय असें पृथ्वीचंद्रोदय म्हणतो. जपाविषयीं योगियाज्ञवल्क्य विशेष सांगतो - चालत, फिरत, हसत, इकडेतिकडे पाहात, नग्न, केस मोकळे असतां, आसनावांचून, झोपलेला, पाय पसरून, केवळ भूमीवर, मंचकादि शय्येवर पडून अशा स्थितींत जप करूं नये. आसनावर बसून मंत्रार्थ लक्षांत घेऊन जप करावा. जपामध्यें क्रोध, मद, क्षुधा, तंद्रा, थुंकणें, श्वान, रजस्वलादि नीचांचें दर्शन घडलें तर सूर्य, अग्नि वा बाम्हाण यांचें दर्शंन घ्यावें; किंवा आचमन प्राणायाम करावा. जप करतांना शिंक वा जांभई आली तर आचमन करावें. विण्मूत्रोत्सर्गाची शंका असतां उत्सर्ग करून कर्म करावें.
जप -
पूजा अशा शंकित स्थितींत करूं नये. तें कर्म अपवित्र होतें. अशुचि वस्त्र परिधान करून, दंतधावन न केल्यानें मुखदुर्गंधि येत असतां जप करूं नये. कारण यायोगें उपास्यदेवता क्रुद्ध होते. जपामध्यें मलमूत्रोत्सर्गाचा संभव असेल तर माला पूर्ण करून उठावें. त्वरा असेल तर ती माळ संख्य़ेंत न धरतां उठावें. मूत्रोत्सर्गकेला तर कोपरापासून हात व पाय धुवावे. आचमन, प्राणायाम, षडंगन्यास करून पुन: जपारंभ करावा. मलोत्सर्ग केला असेल तरस्नानपूर्वक आचमनादि करावें. क्षुतादि निमित्त घडलें असतां जवळ उदक नसेल तर दक्षिणकर्णस्पर्श करावा. कारण ब्राम्हाणाच्या दक्षिणकर्णामध्यें सर्व तीर्थें आहेत. तंत्रांतरे विशेष :--- रस्त्यांत, अपवित्र स्थलीं, अंधकारांत, पायांत पादत्राणें असतां, गाडी - आगगाडी वगैरे वाहनांत जप करूं नये.


References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP