अथ श्रीसूक्तपुरश्चरणविचार:

प्रस्तुत ग्रंथात मंत्र, व्याख्यान, मराठी अर्थ आणि मंत्रविधान एकत्र मिळाल्याने जिज्ञासूंची तृप्ती पूर्ण होईल असा विश्वास आहे.


तत्र मंत्राणां पुरश्चरणं विना सिद्धयभावात्‌ आदौ पुरश्चरणं कर्तव्यम्‌ । तदुक्तं विश्वामित्रकल्पे - ‘जीवहीनो यथा देह; सर्वकर्मसु न क्षम: । पुरश्चरणहीनश्च तथा मंत्र: प्रकीर्तित: ॥’ इति । चं. दीपिकायां ‘पुरश्चरणसंयुक्तो मंत्रो हि फलदायका । पुरस्क्रिया हि मंत्राणां पधानं बीजमुच्यते ॥ किं जपैर्यंननैश्चैव किं ध्यानैर्न्यासविस्तरै:’ इति । पुरश्चरणशब्दार्थो वायुसंहितायाम्‌ ‘साधनं मूलमंत्रस्य पुरश्चरणमुच्यते । पुरतश्चरणीयत्वाद्विनियोगाख्यकर्मणाम्‌ । पुरतो विनियोगस्य चरणाद्वा तथोदितम्‌ ॥’ इति । मंत्रतत्त्वप्रकाशे ‘फलाय राजसेवाया राजसेवा यथा तथा । चरणात्पूर्वमेवात: पुरश्चरणमुच्यते ॥’ इति ॥ - तदेवं पुरश्वरणं नाम अभीष्टफलाय विनियुक्तमंत्राणां फलदानसामर्थोत्पादनाय
पुरत: तत्तन्मंत्रजपसंख्यादिना यद्देवताराधनाद्याचर्यते तत्पुरश्चरणमिति फलितोऽर्थ: । इति ।

अर्थ :--- वैदिक अथवा तांत्रिक कोणत्याही मंत्राच्या फलसिद्धीसाठीं प्रथम त्या मंत्राचे पुरश्चरण अवश्य करावें. ज्याप्रमाणें प्राणावांचून देह कार्यक्षम होत नाहीं, तसाच मंत्रही पुरश्वरणावांचून फल देण्यास समर्थ होत नाहीं. मंत्रफलसिद्धीला पुरश्वरण हें प्रधान कारण आहे. पुरश्वरणावांचून जप, ध्यान, न्यासादि सर्व निष्फल होत, असें बिश्वामित्रक्ल्प व चं. दीपिका यांत स्पष्ट आहे. पुरश्चरण शब्दाचा अर्थ वायुसंहितेंत स्पष्ट दिल आहे. तो असा : ‘पुरत: चरणं’, म्हणजे इष्टफलाकरितां ज्या मंत्राचा विनियोग करावयाचा, तो मंत्र इष्टफल देण्यास समर्थ होण्याकरितां मंत्रजपसंख्यादि उक्तविधीनें देवतेचें पूर्वीं जें आराधन करणें त्यास पुरश्चरण म्हणतात. हा तात्पर्यंत: पुरश्वरण शब्दाचा अर्थ होय.


References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP