ऋषिदैवतच्छंदोविचार:

प्रस्तुत ग्रंथात मंत्र, व्याख्यान, मराठी अर्थ आणि मंत्रविधान एकत्र मिळाल्याने जिज्ञासूंची तृप्ती पूर्ण होईल असा विश्वास आहे.


तत्र वैदिकानां तांत्रिकाणामपि मंत्राणां अनुष्ठानार्थं स्वीकृतानां
ऋष्यादिज्ञानमावश्यकम्‌ । तदुक्तं सर्वानुक्रमपरिभाषायां - ‘न हयेतज्ज्ञानमृते
मंत्राणां श्रौतस्मार्तकर्मप्रसिद्धि: (फलं) आर्षेयछंदोदैवतविद
ब्राम्हाणो याजनाध्यापनाभ्यां श्रेयोऽधिगच्छति ।’ इति । पारिजाते ऽ-
पि - ‘आर्षं छंदो दैवतं च विनियोगस्तथैव च । वेदितव्यं प्रयत्नेन
बाम्हाणेन विशेषत: ॥ अस्मृत्वार्षादिकं विप्रो जुहुयाद्वा जपेदपि । यजेद्वाध्यापयेद्वापि
न लभेत्कर्मणां फलम्‌ ॥ इति । यद्यप्यत्र ऋप्यादिस्मरणे
क्रमवैपरीत्यं तथापि आश्वलायनै: ‘ऋषिर्दैवतं छंदांसि ।’ अनयैव
रीत्या स्मरणक्रम आदर्तव्य: । परिभाषायां तथैव स्वीकारात्‌ शिष्टपरिगृहीतत्वाच्च ।
तदुक्तं सर्वानुक्रमपरिभाषायां - अथ ऋग्वेदान्माये
शाकलके - सूक्तप्रतीकऋक्‌संख्याऋषिदैवतच्छंदांस्यनुक्रमिष्यामो
यथोपदेशमिति । शिष्टाचाराऽप्येवमेव । यथा - गायत्र्या विश्वामित्र:
सविता गायत्री इत्यादि:, प्रयोगकारैरपि अयमेव क्रम: स्वीकृत: सर्वत्र ।
चंडिकादीपिकायां जपप्रकाशे ‘वैदिकमंत्रेषु प्रथमं देवताया: कीर्तनं
पश्चाच्छंदस: इति हि तत्परिभाषा’ इत्युक्तम्‌ । ऋष्यादिज्ञानाभावे
कालाभावे वा ‘यस्य वाक्य’ स ऋषि: या तेनोच्यते सा देवता
यदक्षरपरिमाणं तच्छंद: अमुकसूक्तस्य मंत्रस्य वा अमुककर्मणि
(जपे - अभिषेके - हवने वा) विनियोग:’ इत्येवमुक्त्वा जपाद्यारंभं
कुर्वन्ति शिष्टा: । अथवा ‘केवलदेवतास्मरणमेव वा कुर्यात्‌’ इति
गृहयपरिशिष्टे । विनियोगो हि अवश्यं वक्तव्य: कर्मणोऽङ्गत्वात्‌ ॥

अर्थ :--- कोणत्याही वैदिक वा तांत्रिक मंत्राच्या ऋषि, दैवत व छंदाचें ज्ञान अवश्य
पाहिजे. ऋष्यादिज्ञानावांचून कर्मफलाला वैगुण्य प्राप्त होतें असें परिभाषेंत सांगितलें
आहे. पारिजात ग्रंथामध्येंही ऋषि, दैवत, छंद व विनियोग यांचें ज्ञान नसेल तर
जप - होमादि कर्माचें फल (पूर्ण) मिळत नाहीं असें म्हटलें आहे. अर्थात कर्मारंभीं
तत्तन्मंत्राचें ऋष्यादि - स्मरण अवश्य करावें. आतां ‘ऋषि, दैवत, छंद’ अथवा ‘ऋषि,
छंद, दैवत’ असा पाठक्रम घ्यावा, याबद्दल विसंवाद आहे. तथापि आश्वलायनांनीं
‘ऋषि, दैवत व छंद’ असाच क्रम स्वीकारावा. कारण सर्वानुक्रमपरिभाषेंत प्रारंभींच
‘ऋषिदैवतच्छंदांस्यनुक्रमिष्याम:’ असें म्हटलें आहे. शिष्टपरंपराही अशीच आहे.
नित्याच्या संध्यावंदनादि कर्मामध्यें गायव्यादि मंत्रांचा याच क्रमानें छंदर्षि म्हटला
जातो. मंत्राबद्दल  ऋष्यादिज्ञान नसेल तर अथवा कालाभावीं ‘यस्य वावयं’ ही पंक्ति
म्हणून जपादिकर्मांला प्रारंभ केला जातो. अथवा  केवल देवतास्मरण करुन कर्मारंभ
करावा असें गृहयपरिशिष्टांत म्हटलें आहे. मंत्राचा विनियोग कोणत्या कर्माकरतां
करावयाचा याचा उच्चार अवश्य करावा; कारण विनियोग हेंही कमांचें अंग आहे.


References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP