प्रसंग पांचवा - मूढ दोषी

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


आइतेचि गुरुगुर करिती गुरूच्या नांवें । परी तें सद्‌गुरुत्‍व नाहीं ठावें । मोक्ष उद्धार बोलती स्‍वभावें । करपल्‍लवीच्या न्यायें ॥६५॥
मनुष्‍य देहीं शिष्‍याची सेवा घेती । मोक्षपद उधार बोलती । ऐशा वचनासी जे पातेजती । तेहि बुद्धिहीन दोषी ॥६६॥
हेचि देहीं जरी न पाविजे मुक्ति । तरी कां धरावी सद्‌गुरूची संगती । गृहस्‍थाश्रम स्त्री पुत्र संपत्ती । काय वाईट असे ॥६७॥
स्‍वप्नीं धन गवसल्‍या भरंवसा । धरिला तो जाणिजे महा पिसा । जागा जाल्‍या अवलोकी दाही दिशा । चित्ता हिंवसोनियां ॥६८॥
अन्नाविण पिडोनि उपाशीं निजला । तो स्‍वप्नीं पंचामृत जेविला । सावध होतां असे भुकेला । तैसी उधार मुक्ति ॥६९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP