प्रसंग दुसरा - साधू लक्षण

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


तो साधु भजनीं निराशें भजे । म्‍हणे हे विश्र्वलोक मजचि साजे । ते तारावे गा ईश्र्वरा वोजें । यालागीं ग्रंथ करी ॥२१॥
कृपा धरूनी अवतरे जे स्‍थूळ । तें बत्तीस लक्षणीं केवळ । अपवित्र नष्‍ट देहढाळ । उमटेच ना तेथें ॥२२॥
तो पुण्यात्‍मा असे पवित्र । हृदयीं निज नामाचा गजर । जिकडे जाय तिकडे सारंगधर । मागें पुढें डुल्‍लतसे ॥२३॥
साधु फिरे सहज समाधाना । ते ईश्र्वरासी पावली प्रदक्षिणा । शयन करी तो नमस्‍कार जाणा । श्र्वासोश्र्वास जप त्‍याचा ॥२४॥
शेख महंमद म्‍हणे सद्‌गुरु भूषण । स्‍वामी बोलिले जें वचन । तेणें निवालें माझें अंतःकरण । अष्‍टहि भावें ॥२५॥


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP