मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कृष्‍णाजी नारायण आठल्‍ये|

तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [शार्दूलविक्रीडित]

हे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.


ओली होउनियां किती सुरकुते अंगावरी कातडी ।
पित्तें मस्‍तकही फिरूनि तुटती ओकोनिया आंतडीं ॥

ऐशी संकटमालिका घडिघडी उत्‍पन्न होते नवी ।
वर्णायास्‍तव ती यथास्‍थित बरी मी काय आहे कवी? ॥१०॥
येते भोंवळ मस्‍तकांत न सुचे कांहीच खाणें पिणें ।
वाटे ओढुनि घेतलें व्यसन मी देवा ! नको हे जिणें ॥
कोठें सुंदर बालकें चिमुकलीं कोठें प्रिया लाडकी ।
हा हा मृत्‍यु गमे क्षणक्षण मला येतो तया आड कीं ॥११॥
तोंडें वासुनि नक वक्र गतिनें ग्रासावया धावती ।
मासे पर्वतसे अनेक जवळी येवोनिया पावती ॥
ऐशी क्रूर न दूर तीं चलचरें पाहोनि वाटे भय ।
मार्गामाजि असे प्रसंग पडती सारेच ते दुर्जय ॥१२॥
पक्ष्याच्याच समान मत्‍स्‍य उडुनी दिग्‍मंडळी राहती ।
शुंडा उंच करोनि तंतु टपुनी वेढावया पाहती ॥
मेघीं वीज कडाडुनी चमतके गर्जोनि केव्हां नभीं ।
काळाची जणुं ही ससज्‍ज सगळी सेनाच राहे उभी ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP