मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
रामकविकृत पदें ८७ ते ९०

रामकविकृत पदें ८७ ते ९०

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद ८७ वें.

कृष्णा ! रामा ! लौकरी येईं रे ! ।
भक्तवत्सला गोपाल हरि ! ॥ध्रुवपद.॥
ग्रंथ पहुनियां शब्दज्ञान जालें ।
मन चंचळ बहु बुद्धि नसे थारी ॥कृष्णा०॥१॥
वासना दुर्धर ईचें भय भारी ।
आतां कृपा करीं भवाब्धितें तारीं ॥कृष्णा०॥२॥
देवा ! ऐसें करा अज्ञानग्रथि तोडीं ।
भक्तिपद देईं दीनातें उद्धरीं ॥कृष्णा०॥३॥
अच्युतसुत राम विनवितो ।
चरणी ठाव देईं जन्ममरण वारीं ॥कृष्णा०॥४॥

पद ८८ वें.

ब्रम्हाज्ञान बरें चांगलें । तूं शीघ्र प्राप्ति करूनि घेई रे ! ।
येणें भवपाश तोडिं रे ! त्वरें ॥ध्रृवपद.॥
‘ततत्वंदप’ शोधुनियां वाक्य ।
उत्तम पुरुषीं लक्ष ठेविं रे ! त्वरें ॥ब्रम्हा०॥१॥
पिंडब्रम्हांडाचा स्मर विसरूनियां ।
एक आत्मा मनिं धरिं रे ! त्वरें ॥ब्रम्हा०॥२॥
अवस्थात्रय पंचकोशातीत ।
सर्वसाक्षीचिंतन करिं रे ! त्वरें ॥ब्रम्हा०॥३॥
माया नाहिं नाहिं सर्वचि ब्रम्हा ।
स्मृति हृदयीं हेचि धरीं रे ! त्वरे ?॥ब्रम्हा॥४॥
अच्युतसुत राम शरणागत ।
कृष्णा ! भक्तिपद देईं रे ! त्वरे ॥ब्रम्हा॥५॥

पद ८९ वें.

अनस्य होईं सद्गुरुचरणी रे ! ॥ध्रुवपद.॥
विषयाचें सुख घेसी अहर्निशिं । अझुनि तुझी तृप्ति नाहीं रे ! ।
काळ तुळा नेईल अधोगति । सावध हो हरीतें स्मरीं रे ! ॥अनन्य०॥१॥
आतां तुं ऐसें करीं अहं द्दश्य सर्व विसरी । एकचि हेंचि ध्यान करीं रे ! ।
सर्वभूतीं भक्तिभाव ठेउनि । भवसिंधुपार होईं रे ! ॥अनन्य०॥२||
सहज स्वभावे सक्तर्म करूनि । संचित क्रियमाण जाळीं रे ! ।
निशिदिनिं मुखी रामकृष्ण वदोनि । राम म्हणे हेंचि सार्थक रे ॥अनन्य०॥३॥

पद ९० वें.

आम्ही कैवल्यपदीचे संत मुखी वदूं हरिगोविंद ।
सतत कीर्तनीं प्रेमा निजरूपीं आनंद ॥ध्रुवपद.॥
परात्पर बांधुनि घर तेथें करुनि वस्ती ।
मुक्ति आमुची माता वर्ण असे ब्रम्हा ।
विवेक हेंचि गोत्र माता वर्ण असे ब्रम्हा ।
विवेक हेंचि गोत्र सत्ता करी कर्म ।
स्मृति हेंचि सूत्र नाम आमुचें धर्म. ॥आम्ही०॥१॥
बोध अखंड क्रिया ध्यान उत्तम वस्त्र ।
परा वाचा वाणी गुण अलंकारसहित ।
विहार करूं विजनीं प्रेम निर्निमित्य ।
सूक्ष्य अष्टधा कवच भावें स्मरो अनंत ॥आम्ही०॥२॥
हेंचि कृष्णचि भूषण लेउन साधु ।
विकुंठाहुनि आले जगउद्धरणहेतु ।
जीव भ्रांतीमधें पीडित करुणा करिती बहुत ।
यासि मोक्ष द्यावा म्हणुन आले त्वरित ॥आम्ही०॥३॥
राम म्हणे ऐसा संतमहिमा अपार ।
येथें ठेवा भाव व्हा भवाव्धिपार ।
निशिदिन करा सेवा ब्रम्हापदी राहे स्थिर ।
याहुनि साधन नाहीं हा द्दढ विचार ॥आम्ही०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP