TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय १६

बृहत्संहिता - अध्याय १६

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


अथग्रहभक्तय:
गर्मदानदीचे पूर्वेकडील अर्ध, शोणनद, उड्र, वंग, सुहय, कलिंग, बाल्हीक, शक, यवन, मगध, शबर, प्राग्ज्योतिष, चीन, कांबोज ॥१॥

मेकल, किरात, विटक, पर्वतांतील व पर्वतांजवळील देश, पुलिंद. द्रविडदेशाचे पूर्वार्ध, यमुनेचे दक्षिणतीर ॥२॥

चंप, उदुंबर, कौशांबीनगरी, विंध्यपर्वताची अटवी (अरण्य,) कलिंग, पुंड्र, गोलांगूल (वानरवि.) श्रीपर्वत, वर्धमान ॥३॥

इक्षुमती, तस्करदेशपारतजन, अरण्य, गोप (गाई राखणारे,) बीजें, तुषधान्य (साळी,) कटुद्रव्य मिरीं मिरची इ.), वृक्ष सुवर्ण, अग्नि, विष, युद्धकुशल, ॥४॥

औषध, वैद्य, पश, शेतीलोक, राजे, हिंसा करणारे, प्रवासी, चोर, सर्प, अरण्य (ओसाडप्रदेश,) यशस्वी, तीक्ष्ण (निंबादि कडुपडार्थ,) या सर्वांचा सूर्य स्वामी होय ॥५॥

गिरिदुर्ग (डोंगरीकिल्ले,) सलिलदुर्ग (पाण्यांतील किल्ले,) कोशल, भरुकच्छ, समुद्र रोमक, तुषार, वनवासी, तंगण, हल, स्त्रीराज्य, महासागर (दक्षिणसमुद्र,) द्वीप ॥६॥

मधुररस, पुष्पे, फले उदक, लवण, मणि, शंख, मौक्तिक, जलोत्पन्न (कमलादिक,) शाली, यव, औषधि, गहू, सोमप (याज्ञिक,) आक्रंद (शत्रू पाठीस लागलेले असा राजा,) ब्राम्हाण ॥।७॥

शुभ्र, सर्वजनप्रिय, अश्व, रतिकर (कामी,) स्त्री, सेनापति, भोज्य (अन्नादि भक्षणीय पदार्थ,) वस्त्रे, शृंगयुक्तप्राणी, निशाचर, शेतीलोक, यज्ञसूत्र जाणणारे यांचा चंद्र स्वामी होय ॥८॥

शोणनद, नर्मदानदी, भीमरथानदी यांच्या पश्चिमभागचे देश; निर्विंध्या, वेत्रवती, सिप्रा, गोदावरी, वेणा ॥९॥

गंगा, पयोष्णी, महानदी, सिंधु, मालती, पारा, हया सर्व नद्या; उत्तरपांडयदेशस्थजन, महेंद्रपर्वत, विंध्य, मलय या पर्वतांवरील लोक; चोल ॥१०॥

द्रविड, विदेह, आंध्र, अश्मक, भास, पुर, कौंकण, समंत्रिषिक, कुंतल, केरल, दंडकारण्य, कांतिपुर, म्लेच्छ, संकरजाति ॥११॥

(नासिक, भोगवर्धन, विराटनगरी व विंध्याद्रिपर्वताचे दोहों बाजूंचे देश, तापी व गोमती या नद्यांचे पाणी पिणारे (त्यांच्या कांठीं रहाणारे) ॥१२॥

नगरांत रहाणारे कृषिकर, पारत, सुवर्णकारादि अग्निजीवी, शस्त्रवृत्ति, अरण्यवासी, किल्ला, कर्वटजन, वधरत, घातकपापी, कार्यचाठाईं अस्थिर ॥१३॥

राजे, बाल, हत्ती, दांभिक, डिंभ (शस्त्रावांचून चाललेले युद्धांत घात करणारा किंवा बालघातक,) पशुपालक, रक्तफल, रक्तपुश्प, पोंवळें, सेनापति, गुड, मद्य, तीक्ष्ण (निंबादि) ॥१४॥

कोशभवन, (राजगृह,) अग्निहोत्री, गैरिकादि व सुवर्णादि धातु यांचे स्थान, शाक्य (रक्तपट) संन्यासी, चोर, शठ (परकार्यविमुख,) दीर्घद्वेषी, फार खाणारा, या सर्वांचा भौम स्वामी होय ॥१५॥

लौहित्यनद, सिंधुनद, सरयू, गंभीरिका, रथाव्हा, गंगा, कौशिकी, विपाशा, सरस्वती, चंद्रभागा, हया नद्या; वैदेहजन, कांबोजजन, मथुरेचे पूर्वार्ध, हिमालय, गोमंत (गोमितपर्वत,) चित्रकूत या पर्वतांवर रहाणारे लोक; सौराष्ट्रजन, सेतूने व जलमार्गाने जाणारे, व्यापारी, गुहांत राहणारे, पर्वतवासी, उदपान (तडागवाप्यादिक,) यंत्र, गायन लिहिणे, रत्नपरीक्षा, रंगयुक्ति, गंधयुक्ति या सर्वांते जाणणारे;  चितारीपणा, व्याकरणशास्त्र, गणित, यांचे साधन करणारे; आयुष्य व शिल्प यांते जाणणारे, गुप्तबातमीदार, गारुडादि कपटाने उपजीवन करणारा,  बाल, कवि, शठ (परकार्यविमुख,) दुर्जन, जारणमारणादि जाणता, जासूद, नपुंसक, उपहास (थट्टा) करणारे, भूततंत्रज्ञ, पिशाचे स्वाधीन ठेवणारे, इंद्रजाल (गारुडविद्या) इत्यादि जाणणारे, आरक्षक (पहारेकरी,) नट, नर्तक, घृत, तैल, तेल काढण्याची फले, निंबादि कडू पदार्थ, व्रतचारी (ब्रम्हाचारीप्रभृति,) रसायने करणारे, वेसर (खेचर,) या सर्वांचा बुध स्वामी होय ॥१६॥१७॥१८॥१९॥२०॥

सिंधु नदाचा पूर्वभाग, मथुरेचे पश्चार्ध, भरतजन, सौवीर, स्रुघ्न, हे देश;  उत्तरदिशेस राहणारे लोक,  विपाशानदी, शतद्रु नदी, रमठजन, शाल्व, त्रैगर्त, पौरव, आंबष्ठ, पारत, वाटधान, यौधेय, सारस्वत, आर्जुनायन, मत्स्यजन, हत्ती, घोडा, राजपुरोहित राजा, प्रधान, विवाह, मौंजी इत्यादि मांगल्यकार्ये व पौष्टिककर्मे यांच्याठायी जे आसक्त ते; दया, सत्य, शौच, व्रत, विद्या, दान, धर्म यांनी युक्त; पौर (नागरिक लोक,) महाधन (ईश्वर,) वैय्याकरण, अर्थज्ञ (पंडित,) वेदवेत्ते, नीतिज्ञ, राजोपकरण (शस्त्रोद्यागादि,) छत्र, ध्वज, चामर, इत्यादि; सुगंधिद्र्व्य, जटामांसी, र्स, सैंधव, मुद्रादि वल्लीजधान्य, मधुररस, मेण, चोरक (सुगंधिद्रव्य,) या सर्वांचा स्वामी गुरु होय ॥२१॥२२॥२३॥२४॥२५॥

तक्षशिलानगरी, मार्तिकावतदेश, बहुत आहेत पर्वत ज्यामध्ये अशा गांधार देशांतील जन, पुष्कलावतक, प्रस्थल, मालव, कैकय, दाशार्ण, उशीनर, शिबि हे देश; वितस्ता, इरावती, चंद्रभागा या नद्यांचे जे उदक पितात ते (त्यांच्या कांठी रहाणारे,) रथ, रजत, आकर (हिर्‍यांच्या खाणी) हत्ती, अश्व, महामात्र (महात,) धनवान्. सुगंधिद्रव्य, पुष्पे, अनुलेपन (गंधादि,) पद्मरागादिमणि, हिरे, अलंकार, कमल. शय्या, वर (प्रधान,) तरुण, स्त्री, कामोपकरण (विलासयोग्य जे सुगंधपुष्पादि पदार्थ ते,) मृष्टान्न (स्वच्छ अन्नभोजन करणारे) व मधुर भोजन करणारे, उद्यान (बाग,) उदक, कामोपुरुष; यश, सुख, औदार्य, स्वरूप, यांनी युक्त; विद्वान प्रधान, सावकार, कुंभार, नानाप्रकारचे पक्षी, त्रिपला, कौशेयपट्ट (रेशमाचे वस्त्र,) कंबल, पत्रौर्णिक (धुतलेले रेशमी वस्त्र,) लोध्र, पत्र (तमालपत्र,) चोच (दालचिनी,) जायफळ, अगरु, वेखंड, पिंपळी, चंदन, या सर्वांचा स्वामी शुक्र होय ॥२६॥२७॥२८॥२९॥३०॥

आनर्त, अर्बुद, पुष्कर, सौराष्ट्र, आभीर, शूद्र, रैवतक, या देशांतील लोक; जेथे सरस्वतीनदी गुप्त झाली तो देश, पश्चिमदेश, कुरुदेशस्थजन, प्रभासक्षेत्र, विदिशा, वेदस्मृति हया नद्यांच्या तीरी असलेले लोक; दुर्जन, मलिन, नीच, तेली, नि:सत्त्व, नपुंसक, बंधनस्थ, शाकुनिक (पक्षिघातक,) अपवित्रकर्मरत, कैवर्त (कोळी,) विरूप वृद्ध, डुकरे बाळगणारे, समुदायांत मुख्य, चलितनियम, शबर, पुलिंद (म्लेच्छ,) द्रव्यहीन (दरिद्री,) कटु (निंबादि,) तिक्त (मरिच्यादि,) रसायन, विधवास्त्रिया, सर्प, चोर, म्हैस, गर्दभ, उंट, चणे, वातुल (चंबळी वगैरे वातुळ पदार्थ,) निष्पाव (पावटे,) यांचा स्वामी शनि होय ॥३१॥३२॥३३॥३४॥

पर्वताचे शिखर, कंदर (दरी,) गुहा, यांमध्ये राहणारे; म्लेच्छजाति, शूद्र, कोल्हा खाणारे, त्रिशूल हत्यार बाळगणारे, वोक्काण, अश्वमुख, अंगहीन, कुलास कलंक लावणारे, हिंसा करणारे, कृतघ्न (अनुपकारी,) चोर, सत्यरहित, अशुचि, कृपण, गर्दभ, गुप्तबातमीदार, बाहुयुद्ध जाणणारे, फार रागीट, गर्भस्थ, नीच, कुत्सित, दांभिक, राक्षस, बहुत निद्रायुक्तप्राणी, धर्मरहित, माष, तिल, या सर्वांचा स्वामी राहु होय ॥३५॥३६॥३७॥

पर्वतावरील किल्ले, पल्हव, श्वेत, हूण, चोल, अवगाण मरु, चीन, हे देश; प्रत्यंत (म्लेच्छदेश,) धनवान, मोठी इच्छा करणारे, उद्योगी, पराक्रमी, परस्त्रीरत, वादरत, परच्छिद्राने आनंद पावणारे, मत्त, मूर्ख, धर्मरहित, जिंकण्याची इच्छा करणारे, या सर्वांचा स्वामी केतु होय ॥३८॥३९॥

जो ग्रह उदयकाळी निर्मलकिरण, विस्तीर्णबिंब, स्वभावस्थित, असा असून जर निर्घात (तुफानीवारा,) उल्का (वीज,) रज (धूळ) व ग्रहयुद्ध यांनी ताडित नसेल,  स्वगृही किंवा स्वोच्ची असेल व शुभग्रहांनी द्दष्ट असेल तो ग्रह ज्यांचा स्वामी सांगितला त्यांस शुभकारक होतो ॥४०॥

वरील श्लोकांत ग्रहांची जी लक्षण लिहिली आहेत तद्विपरीत ग्रहांची लक्षणें असली तर त्याचे फळ वाईट होते, शस्त्ररहित कलह, भीति, रोग, यांनी युक्त लोक होतील व राजेही अत्यंत दु:खित होतील ॥४१॥

जर राजांस शत्रुकृत भय होणार नाही तर, स्वपुत्रकृत किंवा प्रधानकृत भय निश्चयाने होईल. देशास अवर्षणाचे भय झाल्यामुळे सर्व लोक पूर्वी न पाहिलेल्या नगर, पर्वत, नदी यांच्याठाई गमन करतील म्हणजे दुष्काळामुळे देशोदेशीं जातील ॥४२॥


॥ इतिबृहत्संहितायांग्रहभक्तयोनामषोडशोध्याय: ॥१६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-02-18T20:12:06.5370000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

twin flexible cord

  • जुळा नम्य रज्जु 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मात स्त्रियांना उपनयनाचा धर्मसंमत अधिकार का नाही?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site