करुणापर मागणें - अभंग १ ते ३

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.


१.
न सगे आयुष्य भविष्य संपति । नाम लक्ष्मीपति द्यावें मज ॥१॥
तेणें तिहीं लोकीं होईनं सरता । आणिक कृपावंता न माथें कांहीं ॥२॥
नामयाचेप्रेम मज देईं देवा । न घालावें खेणा संसारासी ॥३॥
वडिलाचें ठेवणें तुणीं अनिलाषिलें । ते देईं बहिलें पांडुरंगा ॥४॥
संसारतारका भक्तजन पाळका । यादवकुळठिळका केशवराया ॥५॥
भवमूल छेदका गोपीमनरंजका । होसी बंधुसखा यादवकुळां ॥६॥
विठयाचा तूं स्वामि भक्तिप्रेम सुख । यदुवंशटिळक यादवराया ॥७॥
२.
तुजवीण जिवलग सोईरे । मज तों नाहींया दुसरे ॥१॥
विठो धांवें दडवा दडवी । भक्त आपुला सोडवीं ॥२॥
वहुत गांजिलों संसारीं । जोजावलों मदमत्सरीं ॥३॥
विषयसर्पें डंखियला । लोभदंभें भक्षियला ॥४॥
कामक्रोधाचीये धाडी । पडिलोंसे बांदवडी ॥५॥
विठा म्हणे राखें लाज । होसी आमुचा पूर्वज ॥६॥
३.
बोलूरे वेदांतीं बोलूरे सिद्धांती । बोलूं नेती नेती अनिर्वाच्य ॥१॥
बोल बोलरे तूं मना । बोल नारायणा समर्पिला ॥२॥
माझा बाप बोल बोलूनियां गेला । केशव बांधिला बोल बोलें ॥३॥
नामयाचा विठा बोल नाहीं निसरला । केशव उभा केला भक्तिसुखें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 09, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP