मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|कुटुंबातील मंडळींच्या अभंग रचना|गोंदा|

नामदेवाचें चरित्र - वराईची गोणी कळली राजाईसी ...

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.


वराईची गोणी कळली राजाईसी । नामा ब्राम्हाणांसी बोलावीत ॥१॥
इतु क्यामध्यें होन मडकेंभर काढिले । गोणी ते शिविली होती तैसी ॥२॥
द्विज मेळवूनि आला नामदेव । वांटियेलें सर्व द्रव्य त्यानें ॥३॥
नामा म्हणे द्रव्य ज्याचें त्या दिधलें । ऋण तें ठेविलें नाहीं कांहीं ॥४॥
राजाई ते होन सांभाळाया गेली । हातां राख आली कोळशाची ॥५॥
कोळसे देखोनि खोंचली ते मनीं । धन्य तुझी करणी पांडुरंगी ॥६॥
नामदेवापुढें सांगे वर्तमान । चोरोनियां होन म्यां ठेविले होते ॥७॥
पाहतां त्या होनांचे जाहले कोळसे । नामा पाहतसे जाहलें सोनें ॥८॥
वाटिले ब्राम्हाणां तेही होन त्यानें । फेडियलें ऋण गोंदा म्हणें ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP