TransLiteral Foundation

करुणा - अभंग ३१ ते ३३

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


अभंग ३१ ते ३३
३१.
येईं जीवाचिया जीवा । रामा देवाचिया देवा ॥१॥
सर्व देव बंदीं पडिले । रामा तुम्ही सोडविले ॥२॥
मारूनियां लंकापती । सोडविली सीता सती ॥३॥
देवा तुमची ऐसी ख्याती । रुद्रादिक ते वर्णिती ॥४॥
३२.
शरण आलों नारायण । आतां तारीं हो पावना ॥१॥
शरण आला मारुतिराया । त्याची दिव्य केली काया ॥२॥
शरण प्रल्हाद तो आला । हिरण्यकश्यपू मारिला ॥३॥
जनी म्हणे देवा शरण । व्हावे भल्याने जाणोन ॥४॥
३३.
ऐक बापा माझ्या पंढरीच्या राया । कीर्तना आल्यें या आर्तभूतां ॥१॥
माझ्या दुणेदारा पुरवीं त्याची आस । न करीं निरास आर्तभूतां ॥२॥
त्रैलोक्याच्या राया सख्या उमरावा । अभय तो द्यावा कर तयां ॥३॥
जैसा चंद्रश्रवा सूर्य  उच्चैश्रवा । अढळ पद ध्रुवा दिधलेंसे ॥४॥
उपमन्यु बाळका क्षीराचा सागरू । ऐसा तूं दातारू काय वानूं ॥५॥
म्हणे दासी जनी आलें या कीर्तनीं । तया कंटाळुनी पिंटू नका ॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-01-30T20:16:38.6530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अलुत्या

  • पु. तेली , तांबोळी , साळी , माळी , जंगम , कळावंत , डौरी , ठाकर , घडशी , तराळ , सोनार , चौगुला हे बलुत्याच्या खालच्या वर्गाचे १२ कामगार होत . ग्रॅन्टडफच्यामतें सोनार , जंगम , शिंपी , कोळी , तराळ , वेसकर , यांचा हक्क महारापेक्षां निराळा . माळी , डवर्‍यागोसावी , घडशी , रामोशी , तेली , भिल्ल , तांबोळी , गोंधळी यांना नारुकारुच्या उलट अशी संज्ञा आहे . शेतकर्‍यांकडून यांना जें धान्य हक्क म्हणून मिळतें त्याचें प्रमाण ठराविक नाहीं . यांतील सोनार सरकारी नाणीं पारख करणारा पोतदार होय . तराळ म्हणजे पाटलाजवळ सतत हजर असणारा , सरकारी अधिकार्‍यांची सरबराई करणारा , त्यांचें सामान वाहणारा महार होय . बाराच्या बारा अलुते कोठल्याहि खेड्यांतून क्वचितच सांपडतात . कोठें कोठें वाजंत्री , गारपगारी वगैरे नवीन अलुतेदार आढळतात . बलुता पहा . [ बलुता द्वि . ] 
RANDOM WORD

Did you know?

अंत्येष्टी संस्कारात और्द्ध्वदेहिक विधि काय असतो ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site