करुणा - अभंग २८ ते ३०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


२८.
अहो सखीये साजनी । ज्ञानाबाई वो हरणी ॥१॥
मज पाडसाची माय । भक्ति वत्साची ते गाय ॥२॥
कां गा उशीर लाविला । तुजविण शिण झाला ॥३॥
अहो बैसलें दळणीं । धांव घालीं म्हणे जनी ॥४॥
२९.
काय करूं या कर्मासी । धांव पाव ह्रषिकेशी ॥१॥
नाश होतो आयुष्याचा । तुझें नांव नये वाचा ॥२॥
काय जिणें या देहाचें । अखंड अवघ्या रात्रीचें ॥३॥
व्यर्थ कष्टविली माता । तुझें नाम नये गातां ॥४॥
जन्म मरणाचें दु:ख । म्हणे जनीदाखवीं मुख ॥५॥
३०.
अहो ब्राम्हांड पाळका । ऐकें रुक्मिणीच्या कुंका ॥१॥
देवा घेतलें पदरीं । तें तूं टाकूं नको दुरी ॥२॥
होतें लोकांमध्यें निंद्य । तें त्वां जगांत केलें वंद्य ॥३॥
विनवीतसे दासी जनी । परिसावी माझी विनवणी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP