मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|
जानकीची धन्यता

जानकीची धन्यता

अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.


पद - राग जोगी (माझा कृष्ण देखि० या चालीवर.)

धन्यधन्य जगीं या तूं, जनकसुते ॥धृ०॥
पूर्ण ब्रम्हापरात्पर धाम ॥ जे कां योगिजना विश्राम ॥
तो हा मदन मनोहर राम ॥ मेघश्याम कांत तुझा ॥ धन्य० ॥१॥
बाइ तूं श्रीमंताचें मूल ॥ आला काळ तुला प्रतिकूल ॥
नाजुक जणु जाईचें फूल ॥ हें घे दुकूल ॥ नेस सये ॥ धन्य० ॥२॥
या अम्ला न फुलांच्या श्रेणी ॥ आमुचीं वन्यजनाचीं लेणी ॥
गुंफुनि घालुं सखे तव वेणी ॥ हे एणीशुभनयंने ॥ धन्य० ॥३॥
ही तव तनुवल्लरि गोमटी ॥ चंपककुसुमापरि गोरटी ॥
तिये देउं सुगंविक उटी ॥ अधरपुटीं अलक्तका हा ॥ धन्य० ॥४॥
अंजन नयनयुगीं साचार ॥ भाळीं कुंकुम तिलक उदार ॥
कंठीं फुल्लभल्लिका हार ॥ भुजंगाकार अर्पियला ॥ धन्य० ॥५॥
ऐसी पूजुनिया सीता ॥ सांगे गुज अनुसूया माता ॥
सखि या दुर्गमतमवनिं जातां ॥ श्रीरघुनाथा सुख देईं ॥ धन्य० ॥६॥
सांगुनि साध्वीचा सदुदंत ॥ पोटीं धरुनि करी बहु खंत ॥
भरलें विमल प्रेम अनंत ॥ विठ्ठलपंत वाहतसे ॥ धन्य० ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP