मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|
आख्यानांत अवश्य लागणारी कविता

आख्यानांत अवश्य लागणारी कविता

अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.


पद - रामजन्माचें - राग सारंग.

(अमोल काया जाइल वाया) या चालीवर.

पुष्पसमय मधुमास पुण्यतम शुक्लपक्ष तिथिते नवमी ॥ रवि मंगल गुरु शुक्र शनैश्वर ग्रह होते हे उच्चतमीं ॥
कर्क लग्न नक्षत्र पुनर्वसु मेषराशिगत खररश्मी ॥ उदगामिजीवेंदु मध्यदिन असतां संकुल कुसुमीं
हृत्पद्मी द्दढयोग युङमुनि चिंतिताति ज्या यमनियमीं ॥ चिन्मय निष्कल एक शुद्ध इति विविध गाइला जो निगमीं ॥ भक्तकामकल्पद्रुम तो प्रभु करुणरसें पूर्ण द्रवला ॥ श्रीमदयोध्यानगरीं दशरथराजगृहीं हरि अवतरला ॥१॥
सांद्रपयोधरश्याम - मनोहर - रूप जया मन्मथ लाजे ॥ हिरेजडित शिरपेंत तुरा वरि शिरीं किरीट बरवा साजे ॥
भाळिं तिलक कविजना न वदवे कुटिलालककृत शोभाजे ॥ मकराकृति कुंडलें श्रवणयुगिं सुप्रसन्न लोचनजलजें ॥
इंदुवदन नवकुंदरदन शुचि मंदहास अधरीं भ्राजे ॥ ग्रामत्रय मधुरिमार्थ कंठीं जडला जणु रेखाव्याजे ॥ मौक्तिकहार उदार सुभोभित मध्यें कौस्तुभ मणिरुळला ॥ श्रीमदयो० ॥२॥
कटींतटीं उद्दाम पीतपट मंजु किंकिणी गजबजती ॥ जानुजंघ सुकुमार गुल्फयुग वलयनूपुरें रुणझुणती ॥ सहज मृद्दंग आरक्त पदतलध्वजादि चिन्हें विराजती ॥ रम्यमनोहर सरळु अंगुली पूर्ण चंद्रसी नखकांती ॥ त्रिभुवन कलुष क्षपण निपुणतर मंदाकिनि झुळझुळ स्त्रवती ॥ पादयुगुल यत्क्षणिक चिंतनें कर्मबंध सहसा तुटती ॥ दिव्यरूप पाहतां जननिच्या प्रेमपूर हृदयीं भरला ॥ श्रीमदयो० ॥३॥
प्रसन्नदिक्‌चक्रवाल सुंदर मंद गंधवह संवहती ॥ स्वयें हुताशन आयतनात: प्रदक्षिणार्चि: प्रज्वलती ॥ श्रृंगारुनि गृह रत्नतोरणें नागरिक ध्वज उभारिती ॥ द्वारपरिमरीं कुंभदासिका शांति कुंभजल निषिंचति ॥ उजळुनि दीपज्योति कारुजन नीराजनविधि आचरति ॥ वारवधू सालंकृति नाचति मंजुल हरिहर गुण गाती ॥ तननं तननं धिगिति धिगिति धिक् थय्य थय्य रव घुंबरला ॥ श्रीमदयोध्या नगरीं दशरथराजगृहीं हरि अवतरला ॥४॥

रामानें कौसल्येस प्रथम चतुर्भुजरूप दाखविलें. तेव्हां कौसल्येनें स्तवन करून, प्राकृत बालकवत् होण्याची प्रार्थना केल्यावर, पूर्व जन्मवृत्त सांगून रामानें शिशुत्व धारण केलें त्याविषयीं कव्युक्ति.

N/A

References : N/A
Last Updated : January 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP