मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|
पदे ५ ते ८

पदे ५ ते ८

अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.


पद - (इसतन धनकी) या चालीवर.

रामराया दे मज भेटी ॥ होत असें मी फारचि कष्टी ॥धृ०॥
अपराध हे माझे कोटी ॥ दयाघना तूं घाली पोटीं ॥ रामराया० ॥१॥
काय वदूं मी फारचि गोष्टी ॥ तुजविण रामा सारिंहि खोटीं ॥ रा० ॥२॥
कृपासागरा तव या साठीं ॥ लागलीसे आशा मोठी ॥ रा० ॥३॥
विठ्ठलाचा बा जगजेठी ॥ दीनावरि तूं द्यावी द्दष्टी ॥ रामराया० ॥४॥
पद - राग कापी (चाल तारितारीराम०)
दयानिघे. रामराया ॥ आवरि आपुली माया ॥धृ०॥
खोली कळुनी जाया काया ॥ परि लोभ त्यावरि वांयां ॥ दया० ॥१॥
चुकोनियां आपुल्या ठाया ॥ लागलोंसे गोते खाया ॥ दया० ॥२॥
प्रार्थितसें वंदुनि पाया ॥ करा करुणेची छाया ॥ दया० ॥३॥
पंत विठ्ठलासी द्याया ॥ लावी निजगुण गाया ॥ दया० ॥४॥
पद, (चाल - धाव धाव वा) राग बिलावल ताल दिंडी चा०
धाव धावगा धाव राघवा ॥ तुजविण वाटतसे शीण अवघा ॥ धा० ॥धृ०॥
बिरुद हें तुझें दीन रक्षणीं, भार वाहसी नैव पाहसी ॥ अनघ साधवा ॥ धा० ॥१॥
विषय घोर हे चोरसे मला, करुनि विकल निखळ पणें म्हणति नागवा ॥ धा० ॥२॥
जरि न अंतरीं भाव तव पदीं, हरिन जनन मरण रोग ॥ योग याग बा ॥ धा० ॥३॥
पंत विठ्ठला संत पायिंची, करुन वाहाण शहाणपणें ॥ देह लाघवा ॥ धाब०॥४॥
पद - राग, देस.
आलि आली श्रीकृष्ण माउली हो ॥धृ०॥
जसि बाळ वत्सावरि धावली ॥ त्वरें गाउली हो ॥ आ० ॥१॥
स्वभक्तांसी रक्षितसे सर्वदा ॥ प्रति पाउलीं हो ॥ आ० ॥२॥
पंत विठ्ठलाची मति ॥ नाचवी जसि बाहुली हो ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 09, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP