पूर्वमेघ - श्लोक ९६ ते १००

महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर.


(९६) तीचें पाणी सुधवल तुला प्यावया बुद्धि झाली
वांकोनीं जों, सुरगज जसा, पूर्वभागेंचि खाली ॥
छाया तूझी हळुहळु पुढें चालतां तत्प्रवाहीं ।
तीच्या अन्यस्थलिंच यमुनासंगमा लोक पाही ॥

(९७) कस्तूरीचा विखरिति शिलाखंड जेथें सुवास ।
बर्फें शुभ्र प्रभवचि तिचा, पावतां तूं गिरीश ॥
वाटे, जैं तच्छिखरिं बससी अध्वखेदा हराया ।
कीं नंदीनें चिखल खणिला तेथ केली कराया ॥

(९८) पेटे घर्षे सरलतरुंच्या, चेतवी ज्यासि वारा ।
ज्याच्या ज्वाळा गिळिति चमरीपुच्छभारां भरारा ॥
दावाग्नीतें शमविं तिथल्या वर्षुनी वारिराशी ।
आर्तक्लेशप्रशमनपरा, संपदा सज्जनांची ॥

(९९) रागें तेथें शरभ उडुनी, भंगण्यां कीं स्वकाय ।
लंघूं तूतें करिती जरि ते आडवाटे उपाय ॥
वर्षोनीयां विपुल करका, दूर ते हांकवावे ।
केल्या खोटी खटपट हटें, कोण सिद्धीस पावे ? ॥

(१००) तस्माद्नच्छेरनुकनखलं शैलराजावतीर्णां
जन्हो: कन्यां सगरतनयस्वर्गसोपानपङिक्तम् ।
गौरीवक्त्रभ्रुकुटिरचनां या विहस्येव फेनै:
शंभो: केशग्रहणमकरोदिन्दुलग्नो । महस्ता ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP