पूर्वमेघ - श्लोक ५१ ते ५५

महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर.


(५१) वीचिक्षोभें मुखरविहगश्रेणि कांचीच शोभे ।
जीची; दावी, स्खलितगति जी, नाभि आवर्तरूपें ॥
निर्विंध्येचा, पथिं उतरुनी, तूं रसास्वाद घेच ।
वामा प्रेमा प्रकट करिती स्वप्रियीं विभ्रमेंच ॥

(५२) वेणीजैसी तनुसलिल जी, तूं दुरावोनि झाली ।
जीर्णें पर्णें तटिं गळूनियां, पांडुता जीस आली ॥
तूझें, ऐसी विरहविधुरा, थोर सौभाग्य दावी ।
जेणें वृद्धी वरिल सरिता, ती कृती त्वां करावी ॥

(५३) गांवोगांवीं जरठ कथिती वत्सलीला, अवंती ।
ऐसा येतां, विपुलविभवा गांठिं तूं उज्जनी ती ॥
जों लोपूं ये सुकृतनिधि कीं स्वर्गवासीजनांचा ।
शेषें पुण्यें धरणिं हरिला दिव्य तद्भाग साचा ॥

(५४) जो हंसांचीं श्रवणमधुरें कूजितें दूर नेई ।
प्रातकालीं विकचकमलां सेवुनी गंधवाही ॥
शीतस्पर्शें हरित सुरतग्लानि जेथें स्त्रियांची ।
शिप्रावात, प्रियतम करी करी की रतिप्रार्थनाची ॥

(५५) वीचिक्षोभस्तनितविहगश्रेणिकाञ्चीगुणाया:
संसर्पन्त्या: स्खलितसुभगं दर्शितावर्तनाभे: ।
निर्विन्ध्याया: पथि भव रसाभ्यन्तर: सन्निपत्य
स्त्रीणामाद्यं प्रणयवचनं विभ्रमो हि प्रियेषु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP