पूर्वमेघ - श्लोक १६ ते २०

महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर.


(१६) जागोजागीं उठति कदली, हो धरित्री रसाळा ।
जेणें, तूजा रव मधुर तो, ऐकुनीं, मानसाला ॥
जाणारे जे, बिसकिसलयें घेउनीयां फराळ ।
कैलासांती सहचर तुझे होति मागीं, मराळ ॥

(१७) आलिंगोनी तव गिरिसखा घे निरोपा, जयाच्या ।
श्रोणीभागीं विलसति खुणा राममादांबुजांच्या ॥
जेव्हा कालें पडत तुमची गांठ वर्षावसानें ।
सोडावीं तौंप्रणयपिशुनें उष्णबाष्पें जयानें ॥

(१८) ऐकें आधीं तुज कथितसें मार्ग ओ सोइवार ।
संदेशा मी श्रुतिसुखदशा मागुती सांगणार ॥
जेणें जातां, पद गिरिशिरीं ठेवुनी घे विसांवा ।
ताजें पाणी वनतटिनिचें सेवुनी शीण जावा ॥

(१९) तां चावश्यं दिवसगणनातत्परामेकपत्नीमव्यापन्नामविहतगतिर्द्रक्ष्यसि भ्रातृजायाम् ।
आशाबन्ध: कुसुमसद्दशं प्रायशो हयङगनानां
सद्य:पाति प्रणयि ह्रदयं विप्रयोगे रुणद्भि ॥

(२०) कर्तुं यच्च प्रभवति महीमुच्छिलीन्ध्रामवन्ध्यां
तच्छुत्वा ते श्रवणसुभगं गर्जितं मानसोत्का: ।
आ कैलासाद्बिसकिसलयच्छेदपार्थयवन्त:
संपत्स्यन्ते नभसि भवतो राजहंसा: सहाया: ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP