पंचकोशविवेक प्रकरणम् - श्लोक ४ ते ६

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


पूर्वजन्मन्यसन्नेतज्ज्जन्म संपादयेत्‌कथम् ॥
भाविजन्मन्यसन्कर्म नभुंजीतेहसंचितम् ॥४॥

सि०  देहासीच आत्मा म्हणतां ॥ दोष येती आंगीं सर्वथा ॥
आकृताम्यागमता ॥ आणि कृतविप्रणाश ॥३४॥
पूर्व जन्मीं हा देह नव्हता ॥ तैसाची आत्मा होईल तत्वता ॥
मग हा जन्म कोणा वरता ॥ स्थापूं शकशी ॥३५॥
देहालाचि देहाची प्राप्ति ॥ हें ही न घडे कल्पांतीं ॥
पूर्वजन्म, कोणाला निश्चिती ॥ लाविसी बापा ? ॥३६॥
येणें अकृताभ्यागमता ॥ आंगीं लागे तत्वता ॥
आतां कृतविप्रणाशता ॥ तेंही सांगू ॥३७॥
हया देहाचा होतां अंत ॥ कर्म फळ भोग कोण भोगीत ॥
कां कीं देहात्मा नाहीं होत ॥ तोचि भावी जन्मीं ॥३८॥
मग केलेलें कर्म जाण ॥ उपभोगाविण होईल क्षीण ॥
कांकीं भोक्ताच नाहीं जाणा ॥ म्हणोनियां ॥३९॥
एवं प्रकारें करून ॥ दोष येताती दारुण ॥
म्हणोनी अन्नमय कोशा न म्हण ॥ आत्मवस्तु ॥४०॥
वादी - बरें अन्नमय कोश आत्मा नव्हे ॥ देहाला चालक प्राण आहे ॥
तया प्राणमय कोशाला आत्मा हे ॥ बोल लावा ॥४१॥

पूर्णोदेहे बलं यच्छन्नक्षणां य: प्रवर्तक: ॥
वायु: प्राण मयोनासावात्माचैतन्य वर्जनात् ॥५॥

सि० - आपादमस्तक पर्यंत ॥ हा देहीं असे राहत ॥
व्यान  रूपें सामर्थ्य देत ॥ जड देहा ॥४२॥
चक्षुरादि इंद्रियांप्रेरक ॥ हाचि एक असे देख ॥
अन्नाचाही परिपाक ॥ हाचि करी  ॥४३॥
परि एक असे उणें ॥ समजेचें नाहीं जेथ ठाणें ॥
म्हणोनी हीं अवलक्षणें ॥ जडापरी ॥४४॥
सुषुत्प तमाचे वेळीं ॥ हा असोनी देहा जवळी ॥
मृतप्राय दशा आली ॥ कवण्या गुणें ॥४५॥
म्हणोनी हा ही आत्मा नोहे जाण ॥ कां कीं जेथ मुळींच नाहीं चैतन्य ॥
जड काष्ठादि पाषाण ॥ जवा परी ॥४६॥

अहंतां ममतां देहे गेहादौ च करोति य: ॥
कामाद्यवस्थया भ्रांतो मासावात्मा मनोमय: ॥६॥

वादी - जड म्हणोनी प्राणा उपेक्षिता ॥ मन तरी तैसें नाहीं तत्वता ॥
जयाचे ठाईं चैतन्य सत्ता ॥ जागती असे ॥४७॥
सि०- हां हां बरें बोलिलासी ॥ देह गेहादि ममता जयापाशीं ॥
हा मी हें माझें म्हणे अहर्निशीं ॥ वेडया परी ॥४८॥
कामादि विकारी भ्रांत ॥ होऊनी जो असे नाचत ॥
तया भ्रांताशीं आत्मा निभ्रांत ॥ कोण बोले ॥४९॥
जन्मांधा म्हणसी डोळसा ॥ सूर्या परि वाखाणसी कोळसा ॥
सूज्ञ जनचि म्हणसी पिसा ॥ जैशा परी ॥५०॥
तैसा मनोमय कोश भ्रामक ॥ न म्हण आत्मा सम्यक ॥
जो सदांसर्वदां निभ्रांत देख ॥ चैतन्य रूप ॥५१॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP