TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

पंचकोशविवेक प्रकरणम् - श्लोक १ ते ३

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


श्लोक १ ते ३
गुहाहितंब्रम्हा यत्तत् पंचकोशविवेकत: ॥
बोद्धुं शक्यं तत: कोशपंचकं प्रविविच्यते ॥१॥

यत जो प्रत्यगात्मा जाण ॥ तयाचें बुद्धिगुहेंत ठिकाण ॥
तें समजण्या परम कठीण ॥ वाटाडया विण ॥१६॥
वेदा हा जेथील वाटाडी ॥ तया बोलें लंघिल्या कठीण दरडी ॥
पावले गुहा पैलयाडीं ॥ मूनीवर्य ॥१७॥
तेथील तो सकळ देखावा ॥ अज्ञजना समजण्या सुलभ व्हावा ॥
म्हणोनी पंचकोश विवरावा ॥ लागला तयां ॥१८॥
नाना अनेकी भ्रांती ॥ हीच गुहा म्हणोनी थबकती ॥
तया लागीं ही उपपत्ती ॥ सुलभ केली ॥१९॥
जोडावया सत्य कण ॥ कोंडा काढून दाखवती जाण ॥
तैसेंचि हें कोश विवरणा ॥ केलें वाटे ॥२०॥
इया विवरणा वांचून ॥ शक्य न होय वस्तु दर्शन ॥
चिंध्या सोडितांचि जाण ॥ रत्न लाभे ॥२१॥
नाना पाण्यावरील बाबुळी ॥ सारूनी करितां वेगळी ॥
द्दष्टी पैठतसे जैशी जळी ॥ तैसें होय ॥२२॥

देहादभ्यंत्तर: प्राण: प्राणादभ्यंतरं मन: ॥
तत: कर्ता ततो भोक्ता गुहासेयं परंपरा ॥२॥

जड देहाचे डोंगरीं ॥ प्राण गुहा असे अंतरीं ॥
तियेच्याही अभ्यंतरीं ॥ मनो गुहा ॥२३॥
मन गुहेच्या आंत ॥ विज्ञानमय कर्ता राहता ॥
तयाचे ही आंतरांत ॥ भोक्ता आनंदमय ॥२४॥
एवं परंपरा जाण ॥ पंचकोश असती निर्वाण ॥
तयांशीं गुहा उपलक्षण ॥ वेद बोलिला ॥२५॥
वेदें शब्दें दंश केला ॥ जड पोकळ बोलिला सकळां ॥
येथ अर्थ नाहीं म्हणोनी प्राण्याला ॥ सुचना केली ॥२६॥
रायाचा शुद्धा संकेत ॥ करावया अभिव्यक्त ॥
मंत्री जैसा बहु बोलत ॥ तैशा परी ॥२७॥
अन्नमयादि पंचकोश ॥ मुनि बिवरोनी दाविती सावकाश ॥
कधींही न व्हावी मतिभ्रंश ॥ म्हणोनियां ॥२८॥

पितृभुक्तान्नजाद्वीर्याज्जातोऽन्नेनैव वर्धते ॥
देह:सोऽन्नमयो नात्मा प्राक चोर्ध्वं तदभावत: ॥३॥

मातापितरें अन्न भक्षिती ॥ तया पासूनी रेताची उत्पत्ति ॥
तया रेतीं देह प्राप्ति ॥ हें ठाउकें सकळां ॥२९॥
एवं अन्नमय देह जाहला ॥ पुढें अन्नेची वाढूं लागला ॥
म्हणोनी अन्नमय कोश तयाला ॥ बोलिताती ॥३०॥
अन्नाचा जो विकार होतो ॥ तया आत्मा कोण म्हणतो ॥
आद्यंतीं अभाव असतो ॥ जया लागीं ॥३१॥
कार्य म्हणोनि नाशिवंत ॥ आत्मा सदा सर्वदा शाश्वत ॥
एवं अन्नमय कोश नाहीं होत ॥ आत्मा जाण ॥३२॥
वादी - अन्नमय कोशाचा हेत ॥ बोलिला तो असे सत्य ॥
परि तें कार्य आत्मा होत ॥ ऐसें कां न म्हणा ॥३३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-12-02T03:40:28.2370000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ताट्या

  • a  That cats at the table of. 
  • वि. १ ( एखाद्याच्या ) पंक्तीला जेवावयास हजर असणारा ; पंक्तिपठाण ; कांही काम न करतां फक्त जेवणापुरता हजर राहणारा . २ एखाद्या मोठ्या गृहस्थाच्या पंक्तीस बसण्याचा मान असणारा . पै बृहस्पती मुख्य आपण । ऐसे स्वस्तीश्रियेचे ब्राह्मण । ताटियेचे सुरगण । बहुवस जेथे । - ज्ञा ९ . ३२५ . [ ताट ] 
  • न. ( कों . ) लहान रेडा ; रेडूक . ( अव . ताटे ). - बदलापूर २१ . 
  • m  A young male buffalo. 
RANDOM WORD

Did you know?

कोणती वस्तु खाण्यातून वर्ज्य अथवा तिचा त्याग केल्याने काय पुण्य किंवा फळ मिळते?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site