महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक १०७ ते १०९

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


दिने दिने स्वप्नसुप्त्योरधीते विस्मृतेऽप्ययम् ॥
परेद्युर्नानधीत: स्यात्तद्वद्विद्या न नश्यति ॥१०७॥

प्रमाणोत्पादिता विद्या प्रमाणं प्रबलं विना ॥
न नश्यति न वेदांतात्प्रबलं मानमीक्ष्यते ॥१०८॥

जैसें कां करितां अध्ययन ॥ स्वप्न सुषुप्तींत होतें विस्मरण ॥
परि प्रबोधकाल होतांचि जाण ॥ जैसेंच्या तैसें ॥४७८॥
तैसेंचीं हेंही ज्ञान ॥ न नासें होतां ही विस्मरण ॥
नाना विस्मरणचि नासतसें जाण ॥ इया बोधें ॥४७९॥
सूर्य असतांचि जवळी ॥ कैसी तमाची होय झांकोळी ॥
परिस भेटतांची लोहाची मैळी ॥ परतोनी येई ? ॥४८०॥
तैसें प्रमाण सिद्धज्ञान ॥ त्यास कोण करील अप्रमाण ॥
वेदांत केसरी गर्जोंन ॥ बोलिला जें कां ॥४८१॥
इतर शास्त्रें जंबुकें ॥ न होतींच जया सन्मुखें ॥
भयें थबकलीं देखें ॥ ठाईंच्या ठाईं ॥४८२॥
आणखी मतवादी सावजें ॥ निष्प्राणवत झालीं खुजें ॥
तिहीं काय नाशिजें ॥ इया ज्ञाना ॥४८३॥

तस्माद्वेदांतसंसिद्धं सदद्वैतं न बाध्यते ॥
अंतकालेऽप्यतो भूतविवेकान्निर्वृत्ति: स्थिता ॥१०९॥

तस्मात वेदसिद्धांत ॥ सदद्वैत हाचि यथार्थ ॥
ब्रम्हाप्राप्ति प्राण्या होत ॥ जया निश्चयें ॥४८७॥
ऐसा हा भूतविवेक ॥ जे नित्य विचारें करती सम्यक ॥
तया ब्रम्हापद देख ॥ आधींच आलें ॥४८८॥
अंतकाळीं ही भ्रांती ॥ तया न होय निश्चिती ॥
पूर्णं लाभे न्निवृत्तिस्थिती ॥ पठण मात्रें ॥४८९॥
श्रीमुनीविद्यारण्य ॥ घेउनी माळेचें प्रमाण ॥
केले नवाधिकशत जाण ॥ श्लोकमणी ॥४९०॥
ही माळाजे जपती ॥ तयां काळाची नाहीं भीती ॥
सदद्वैत मेरू निश्चिति ॥ येती तया ठाया ॥४९१॥
मेरुचिया पैटी ॥ स्थित होतां नाहीं राहटी ॥
इयाचा विचार करितां शेवटीं ॥ सतचि होती ॥४९२॥
जे अलक्ष्य करुनी उपेक्षती ॥ तयां होय पुनरावृत्ती ॥
म्हणोनी लक्ष्य ठेवोनी निश्चिती ॥ बुद्धि करावी ॥४९३॥
हा ! हा ! जन्मभूमीच्या ग्रामीं ॥ मी स्नात झालों इया संगमी ॥
सदद्वैत गंगा नामीं ॥ देखोनीया ॥४९४॥
श्लोक नद्या मिळाल्या ॥ समस्तही गंगारूप जाहल्या ॥
त्याही म्यां वंदिल्या ॥ भक्तिभावें ॥४९५॥
तेथ ओवियें भरुनी अंजुली ॥ श्रीसतगुरुपदीं अर्ध्यदानें अर्पिलीं ॥
सोहंपदें जपली गायत्री माता ॥४९६॥
झाली संध्या संदेह निरसला ॥ सतगुरु ह्रदयींच प्रगटला ॥
ब्रम्हानंद दुमदुमिला ॥ सर्वत्रभर ॥४९७॥
नाना दुर्भिक्ष पडलें पृथ्वी वरी ॥ तेणें गांजिलें विश्व भारी ॥
म्हणोनी ओवियें अभिषेकला त्रिपुरारी ॥ विश्वपिता ॥४९८॥
तो सदद्वैत रूपें प्रकट्ला ॥ सदन्नाचा सुकाळ झाला ॥
तेणें द्वैत दुष्काळ लया गेला ॥ विश्व जनाचा ॥४९९॥
किंवा श्लोक नव्हती हे ब्राम्हाण ॥ तया ओवियें नमस्कारिलें जाण ॥
पंचाशत परिपूर्ण ॥ साष्टांग भावें ॥५००॥
येथ मिया काय केलें ॥ श्रीसतगुरुचि ह्रदयांतुनी बोले ॥
तेंचि ओवियें लिहिलें ॥ त्यांचें त्यांनीं ॥५०१॥
नाम घेतां ग्रासोग्रासीं ॥ तो नर जेविलाची उपवासी ॥
तैसाचि मी गोविंद नामा सरसी ॥ अक्रिय जाहलों ॥५०२॥
ऐशा हया तीन ओवियें वरती ॥ करूनी आत्मरायाची स्तुति ॥
भूतविवेक समाप्ति ॥ होती झाली ॥५०३॥

॥ इति श्रीहरिगीते हरीहरराय विरचिते भूतविवेकनाम द्वितीय प्रकरण समाप्तं ॥

॥ ॐ तत् सत् - शांति: शांति: शांति: ॥


N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP