महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ९१ ते ९७

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


सतो विवेचिते वन्हौ मिथ्यात्वे सति वासिते ॥
आपो दशांशतो न्यूना: कल्पिता इति चिंतयेत् ॥९१॥

एवं प्रकारें करून ॥ मिथ्या ठरतां दहन ॥
तया दशांशन्यून ॥ आपही विवेचावें ॥४२९॥

संत्यापोऽमू: शून्यतत्त्वा: सशब्दस्पर्श संयुता: ॥
रूपवत्योऽन्यधर्मानुवृत्त्या स्वीयो रसो गुण: ॥९२॥

सतोविवेचितास्वप्सु तन्मिथ्यात्वं च वासिते ॥
भूमिर्दशांतो न्यूना कल्पिताप्स्विति चिंतयेत् ॥९३॥

अस्ति  भूस्तवत्त्शून्यास्यां शब्दस्पर्शौ सरूपकौ ॥
रसश्च परतो गंधौ नैज: सत्ता विविच्यताम् ॥९४॥

पृथककृतायां सत्तायां भुमिर्मिथ्याऽवशिष्यते ॥
भूमेर्यशांशतो न्यूनं ब्रम्हांडं भूमिमध्यगम् ॥९५॥

ब्रम्हांडमध्ये तिष्टंति भुवनानि चतुदर्श ॥
भुवनेषु वसंतेषु प्राणिदेहा यथा यथम् ॥९६॥

ब्रम्हांडलोकदेहेषु सद्वस्तुनि पृथक कृते ॥
असंतोंऽडदयो भांतु तद्भानेऽपीह का क्षति: ॥९७॥

पाणी आहे हीच सत्ता ॥ ती बुद्धिनें विवेकें वेगळी करितां ॥
बाकी राहे निस्तत्वता ॥ तें मायारूप ॥४३०॥
तेथ शब्दगूण अकाशाचा ॥ स्पर्श तो असे वायूचा ॥
रूप धर्म वसे अग्नीचा ॥ रस स्वकीय वसे ॥४३१॥
एवं हे सकळही गूण ॥ सत्ता विरहीत निस्तत्व जाण ॥
विचारें करावें पृथक्करण ॥ आप तत्वाचें ॥४३२॥
एवं विचारें करुन ॥ पृथ्वीतत्त्वही विवरावें जाण ॥
जें असें दशांशें न्यून ॥ आप तत्वाचें ॥४३३॥
आकाशादि भूतांचे ॥ घेऊनी शब्दादि गूण साचे ॥
गंध गूण स्वकीय पणाचें ॥ धर्मत्व असे ॥४३४॥
तेथही सत्ता वेगळी करितां ॥ राहे मिथ्या पृथ्वी रूपता ॥
ती त्यागावी तत्वता ॥ असार म्हणोनी ॥४३५॥
भूमी दशांशें न्यून ॥ ब्रम्हांडमध्य भूमी जाण ॥
तियेवरी चतुर्दश भुवन ॥ पाताळ खर्गादि ॥४३६॥
तिये भुवनांतरीं ॥ प्राणी वसती देहधारी ॥
खकर्म प्रारब्धानुसारी ॥ यथा योग्य ॥४३७॥
एवं ही ब्रम्हांड रचना ॥ मायिक उभारली जाणा ॥
येथ सदत्वाचा ठिकाणा ॥ विचारें विवरावा ॥४३८॥
सत् असतांचि जें आहे ॥ येर्‍हवीं मुळीच नोहें ॥
मायामय अघवें हें ॥ मिथ्या रूप ॥४३९॥
जरि हें दिसलें किंवा भासलें ॥ तरि तें मिथ्यारूपचि ठरलें ॥
मृगजळ वांझबाळें ॥ जिया परी ॥४४०॥
येथ सर्वत्र एकलीच सत्ता आहे ॥ दुजें कांहीं एक नाहीं, नोहें ॥
हें पतिज्ञा पूर्वक बोलतहि ॥ वाणी माझी ॥४४१॥
वादी - बरें असो तुमचे मतें ॥ सतचि झालें सकल भासतें ॥
तेणें काय लाधला फळातों ॥ आम्हा सांगा ॥४४२॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP