महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक २८ ते २९

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


मग्नस्याब्धो यथाऽक्षाणि विव्हलानि तथास्य धी: ॥
अखण्डैकरसं श्रुत्वा नि:प्रचारा बिभेत्यत: ॥२७॥

मदिरापानें झाला उन्मत्त ॥ तो काय एक न बोलत ॥
तैसेंचि हें प्रतिपादित ॥ असत्य वादी ॥१०१॥
नाना डोळियां झाली कावळी ॥ मग तो कोणती वस्तु न म्हणे पिंवळी ॥
जें जें दिसे तया जवळी ॥ तें तें पीतची भासे ॥१०२॥
किंवा क्षारसमुद्रीं बुडाला ॥ मग जैसे धुरकट देखे वस्तूला ॥
तैसेचि या तया विव्हला ॥ बुद्धि झाली ॥१०३॥
एवं असत पूर्वीं होतें ॥ हें म्हणणें दिसे अरुतें ॥
आपणचि आपुल्या व्याघातें ॥ जिवें कैसा ॥१०४॥
वांझेचिया मुला ॥ कोण मातेचा सोहळा ॥
नाकोणडोंगरी मृगजला ॥ उगम झाला ॥१०५॥
विषेन कैसें जियावें ॥ असतचि कैसे हुवावें ॥
प्रेतें कैसें वदावें ॥ स्व मृत्युतें ॥१०६॥
अखंडैकरस वस्तु ॥ तेथें कैच्या इया मातु ॥
ऐकोनीया श्रुति सिद्धांतु ॥ भयें लपाली ॥१०७॥

गौडाचार्या निर्विकल्पे समाधावन्ययोगिनाम् ॥
साकारब्रम्हानिष्ठानामत्यंतं भयमूचिरे ॥२८॥
अस्पर्शयोगो नामैष दुर्दर्श: सर्वयोगिमि: ॥
योगिनो बिभ्यति हयस्मादभये भयदर्शिन: ॥२९॥

साकार ब्रम्हानिष्ट योगी ॥ किती दुर्दशा पावती आंगीं ॥
गौडाचार्य तया लागीं ॥ बाल म्हणती ॥१०८॥
जैसे बालें भिती बागुलाला ॥ तैसेचि हे योगी “अस्पर्श” योगाला ॥
अभये भय दर्शनाला ॥ प्रतिपादिती ॥१०९॥
साकार ध्यान निष्टा ॥ करुनि मिरविती प्रतिष्ठा ॥
म्हणती निर्विकल्पाचिया वाटा ॥ कष्टमयी ॥११०॥
कल्पियेलें ध्यान ॥ दिसे तोंवरी समाधान ॥
नाहीं तरी रुदन ॥ करिताती ॥१११॥
अखंड स्वात्माराम ॥ तेथें न करिती आराम ॥
सुगमचि मानिती दुर्गम ॥ भयप्रद ॥११२॥
शं० - योगिया भय कां वाटावे ॥ प्राणायामादि साधिती आघवे ॥
अस्पर्शयोगातें भियावे ॥ कवणे रीती ॥११३॥
स० वृत्तीचा आधार तुटतां ॥ वाटे येईल मृत्यु अवस्था ॥
आपण नाहींसे हौं हें भय चित्ता ॥ निरंतर वाटे ॥११४॥
सद‌वस्तु असत कल्पिती ॥ येणें भांबावलेनी चित्तीं ॥
अभये भयचि मानिती ॥ मूर्ख पणें ॥११५॥
आपण दुसरें कल्पावें ॥ मग योगें तेंचि आपण व्हावें ॥
यया परीस आपण आपुले स्वभावें ॥ कां न मुरावें ॥११६॥
आपणचि  आपण होतां ॥ अस्पर्श योग साधे आयिता ॥
परि या गुरुगम्य वार्ता ॥ येरा कानडया ॥११७॥
अमृतसागरीं बुडतां ॥ वाटे मृत्युचें भय चित्ता ॥
ऐशा हया योगियांच्या वार्ता ॥ एकरसीं आटणी ॥
वसे तेथें स्पर्शालागोनी ॥ प्रधानत्व ॥११९॥
तुम्ही अस्पर्श आणि योग म्हणतां ॥ हें विपरीत वाटे आमुचे चित्ता ॥
ब्रम्हाचारी स्वपुत्र वार्ता ॥ कैसी मानी ॥१२०॥
स० कर्ष स्पर्श संयोग आणि योग ॥ ऐसे चार असती योग विभाग ॥
तयांचें ही यथासांग ॥ वर्णना करूं ॥१२१॥
वस्तु वस्तुशीं आकर्विती ॥ तया गुरुत्वाकर्षण म्हणती ॥
ही योगाची प्रथम जाती ॥ कर्षयोग ॥१२२॥
तेथें सजात न विजात ॥ एकमेकाशीं आकर्षित ॥
परि मिळणी नाहीं होत ॥ एकरसीं ॥१२३॥
काळें एकमेक भिडती ॥ तया स्पर्शयोग म्हणती ॥
इयाची ही होय स्थिती ॥ प्रथमा सारखी ॥१२४॥
आतां तिसरा जो संयोग ॥ तो सजाती विण न होय सांग ॥
विजातीयाशीं प्रसंग ॥ कधींच न करी ॥१२५॥
परि इयांचें मिश्रण ॥ ओळखताती सुजाण ॥
कांकीं एकरसी आटण ॥ नव्हे म्हणोनी ॥१२६॥
जैसें दुग्धीं पाणी मिसळलें ॥ संयोगीं एकत्वची दिसलें ॥
परि राजहंस चोंचीं निवडलें ॥ पाणी तें पाणी ॥१२७॥
आतां ऐक बापा योग ॥ जो सकळ धुरीची सीग ॥
योगीये टाकिती आंग ॥ जया ठायीं ॥१२८॥
तो मिळणी एकवटला ॥ पुनरपि न निवडे कोणाला ॥
परि द्वैतपणास जागा दिला ॥ एकरसीं ॥१२९॥
तैसा नव्हे अस्पर्श योगु ॥ ज्याचा मुळींच नाहीं वियोगु ॥
प्रतिबिंब बिंबातें आंगु ॥ स्पर्शिलें जैसें ॥१३०॥
नाना रज्जुसर्पाभासु ॥ ज्ञान होतांचि होतसे नासु ॥
मग मिळणी तियेचा स्पर्शु ॥ तिये जैसा ॥१३१॥
कां भ्रमें कोणी विसरला ॥ हा मी नोहेचि म्हणे आपुल्याला ॥
भ्रमनिरसतांचि योग झाला ॥ त्याचा त्याला ॥१३२॥
नाना स्वप्नीं आपण मेला ॥ बहु लाक्रोशें रडुं लागला ॥
प्रबोध होतांचि लाधला ॥ आपआपणा ॥१३३॥
किंवा स्वप्नीं भद्रजाति ॥ भिक्षा मागतां जाजावला बहुति ॥
जागा होतांचि मिळाला निश्चिती ॥ राजवैभवा ॥१३४॥
हें जैसें का मिळणें ॥ किंवा झालीं स्पर्शलक्षणें ॥
तैसिये ठाईं असणें ॥ अस्पर्श योगू ॥१३५॥
आपणासी आपण मिळणें ॥ हींच अस्पर्शयोगाचीं लक्षणें ॥
सिद्धचि कृतक नव्हती जाणे ॥ इतरां परी ॥१३६॥
ऐसा सोडूनी राजपथ ॥ भ्रमिष्ट होती भयाभीत ॥
तयांसी श्रीगुरु दूषित ॥ आचार्यही ॥१३७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP