महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ६ ते ९

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


श्रोत्रं त्वकचक्षुषी जिव्हा घ्राणं चेंद्रियपंचकं ॥६॥
कर्णादिगोलकस्थं तच्छब्दादिग्राहकं क्रमात् ॥
सौक्ष्म्यात्कार्यानुमेयं तत्प्रायो धावेद्बहिर्मुखम् ॥७॥

आकाशाचें इंद्रिय श्रोत्र होत ॥ तें कर्णगोलकीं राहत ॥
शब्दाशीं ग्रहण करीत ॥ अंतर्बाहय ॥२३॥
वायुचें त्वगेंद्रिय होत ॥ तें सर्वशरीरभर राहत ॥
स्पर्शानें झालें जाणत ॥ अंतर्बाहय ॥२४॥
अग्रींपासून चक्षु झाले ॥ ते नेत्रगोलकीं राहिले ॥
अंतर्बाहय पहाते झाले ॥ रूपालागीं ॥२५॥
आपाची जिव्हा झाली ॥ ती रस चाखुं लागली ॥
रसना नाम पावली ॥ मुखगोलकीं ॥२६॥
पृथ्वीचें झालें घ्राण ॥ तें गंधातें करी ग्रहण ॥
नासिकगोलकीं राहून ॥ अंतर्बाहय ॥२७॥
इंद्रियें असती सूक्ष्म जाण ॥ तयांचा कार्यावरूनी अनुमान ॥
जयाचें नेहमी क्रमण ॥ बाहयप्रदेशीं ॥२८॥
“परांचि खानिव्यतृणत्स्वयंभू:” इति ॥ प्रमाण बोलियली श्रुति ॥
अनुभवें पहावें निश्चिती ॥ आपणही ॥२९॥
शंका - बाहयार्थ इंद्रियें ग्रहण करिती ॥ परि अंतर कैसेनी जाणती ॥
तयाची करावया प्रचिती ॥ श्लोकद्वय बोलिले ॥३०॥

कदाचित् पिहिते कर्णे श्रूयते शब्द आंतर: ॥
प्राणवायौ जाठराग्नौ जलपानेऽन्नभक्षणे ॥८॥
व्यज्यंते हयांतरा: स्पर्शा मीलने चांतरं तम: ॥
उद्नारेरसगंधौचेत्यक्षाणामांतरग्रह: ॥९॥

कर्णीं बोटें घालुनी पाहतां ॥ ऐकुं येती अंतर्ध्वनिता ॥
जलपानें किंवा अन्न भक्षितां ॥ स्पर्श समजे ॥३१॥
नेत्रांचें करितां मीलन ॥ अंतर तम दिसतसे जाण ॥
ढेंकर येतां तत्क्षण ॥ गंव रस समजे ॥३२॥
येणेंयेणें सर्वो परी ॥ अंतरजाणती चतुरी ॥
अंतर ग्राहक निर्भारी ॥ इंद्रियें असती ॥३३॥
आतां कर्मेद्रियांचें करावया कथन ॥ मुनी बोलियेले श्लोक दोन ॥
तयांचें ही विवरण ॥ करूं पुढती ॥३४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP