साम्राज्यवामनटीका - श्लोक १४१ ते १५५

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


ब्रम्हा सर्वहि वृत्तींच्या निरोधानेंच पावणें ।
अंतर्मुख पूरक तो प्रपंचिं रेचक सुटे ॥१४१॥
अद्वैत स्थिर वृत्ती जे तो प्राण स्थिर कुंभक ।
प्राणायम असा त्याचा न होय इतरांस तो ॥१४२॥
व्यतिरेकें आवरणा विक्षेपा अन्वयें तसी ।
नासे तेव्हांच जाणावें अद्वैत कळलें तया ॥१४३॥
गेली आवरणाविद्या विक्षेपा राहते तया ।
नाशिती जाणुनी सर्व जड हें चित्स्वरूपची ॥१४४॥
आत्माच विषयीं वाटे मन चित्स्वरुपीं असे ।
प्रत्याहार असा त्यांचा जो मुमुक्षूंस उत्तम ॥१४५॥
ब्रम्हीं निराकार वृत्ति स्थिर जें ध्यान त्यास तें ।
ब्रम्हाकारपणें वृत्ती स्थिरता जे समाधि तो ॥१४६॥
ब्रम्हाचि स्फुरतें तेथें ज्मन जेथेंचि जाय तें ।
मनाची धारणा हेची मुमुक्षां अति उत्तम ॥१४७॥
तो राजयोगी गुरुदेव भक्त, योगांगमात्रींच समाधियुक्त ।
विष्णु स्वयें तो तनु जे तयाची, जीवोद्धरा देवनदीच साची ॥१४८॥
वसे प्रपंचीं परि निष्प्रपंच, असा असे ज्या परमार्थ साच ।
होऊनि त्या युक्त जरी अशुध, प्रपंचिं साधे परमार्थ शुद्ध ॥१४९॥
नारायण पद्मभव नारद व्यास शूकही ।
आचार्य जे गौडपाद गोविंद भगवत्पद ॥१५०॥
यतींद्र शंकराचार्य पृथ्वीधरहि ते तसे ।
यति श्रीसच्चिदानंदरूपें परमहंस जे ॥१५१॥
तत्कृपें वामनस्वामी ज्यांहीं गुहय प्रकाशिलें ।
परात्पर सामराज्य तुकोबा परमेष्ठि ते ॥१५२॥
बाळ कृष्ण ते परम परमानंद श्रीमुरू ।
प्रकाशी गुहय तें ऐसें सर्वात्मा वासुदेव हें ॥१५३॥
कृतार्थ तें वंदन नित्य ज्यांतें. कृपेन ज्यांच्या वदलों तयांतें ।
परंपरा वर्णुनि त्यांच पायीं, पुन:पुन्हा वंदिंच सर्व ठायीं ॥१५४॥
काया वाचा मनेंद्रीयें अहंकारें स्वभावेंहि ।
म्यां हें केलें कर्म सर्व अर्पीं नारायणाप्रती ॥१५५॥


॥ इति श्रीवामनस्वामीकृतानुभूतिलेशस्य साम्राज्यवामनटीका समाप्ता ॥


N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP