साम्राज्यवामनटीका - श्लोक ६१ ते ८०

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


अनंतानंत ब्रम्हांडीं अलंकारीं सुवर्णवत् ।
आपणचि निराकार आनंदाद्भववैभव ॥६१॥
तेंच हें सगुण ब्रम्हा म्हणूनि श्रुतिवर्णिते ।
‘पुरुष एवेदं सर्व’ पुरुष जाण सर्वही ॥६२॥
पुरुष म्हणतां येतो प्रकृतीसहि घेउनी ।
व्यापी आपणचि जग सगुण ब्रम्हा तें असे ॥६३॥
अव्यक्ततत्त्व प्रकृति ब्रम्हानुभूति ब्रम्हा जें ।
अनूभवात्मक त्यातें सगुण ब्रम्हा बोलिजे ॥६४॥
व्यापिलें जग ब्रम्हानें रज्जूनें सर्प ज्या परी ।
असें तें जग ब्रम्हींच सर्प रज्जूमधें जसा ॥६५॥
न तें ब्रम्हा जगामाजी न रज्जू सर्पिं त्यापरी ।
जग ब्रम्हीं नसे तेंही जसा सर्प न अरज्जुंत ॥६६॥
एवं चारी प्रकारेंही जग नाहींच जें असे ।
ब्रम्हा तें सगुण ब्रम्हा असावें जाणुनी तया ॥६७॥
आकार जो दिसे तोचि योग ऐश्वर्यची असे ।
योग तो युक्तिचातुर्य सामर्थ्य ऐश्वरचि तें ॥६८॥
आहे वस्तु परब्रम्हा नाहीं तें जग दाखवी ।
युक्ति चातुर्य तें ऐसें कीं सामर्थ्यचि तें तसें ॥६९॥
ज्याचें सामर्थ्य ऐश्वर्य असें कीं तोचि तें स्वयें ।
भगवंताय त्या विश्वाकाराय च नमो नम: ॥७०॥
हा अघटीतघटना योगाइश्वर्य गूण जो ।
सिद्ध यांत असें ब्रम्हा नाहीं तें जग दाखवी ॥७१॥
दिसोनि जग तें नाहीं ऐश्वर्यीं ज्ञान प्राप्त जें ।
ज्ञानीं त्या सिद्धस्वरूप त्रिगुणातीत निर्गुण ॥७२॥
जाणे चिच्छक्ति त्या ज्ञानीं सतस्वरूप असज्जग ।
परी कल्पी जग हि ते कल्पनासह तें जग ॥७३॥
मिथ्या स्थाणुत्वीं पुरुष जाणे ज्ञानगुणेंच त्या ।
तेव्हां जगचि तें ज्ञान वैराग्य सिद्ध त्यांतची ॥७४॥
प्रिय सत्य स्वरूपची असत्य जगिं अप्रिती ।
श्रुतिज्ञ जो तया मिथ्या रजतीं अप्रिती जसी ॥७५॥
वैराग्य गुण हा त्यांत झाला धर्म फलद्रुप ।
भवबंधन त्या धर्मीं मिथ्याच जग जाणतां ॥७६॥
धर्में सत्कर्म समता कर्माचें फळ देउनी ।
सदयें तरुणोपायें सन्मार्गीं जीव तारिले ॥७७॥
धर्में अशा कल्पिलें तं ज्ग कर्म तुझें असे ।
तें ब्रम्हा तूं दयायुक्त सगुण समनाथ ही ॥७८॥
शुद्ध सत्त्व तुझा धर्म नाहीं तो तुजवांचुनी ।
जसें न कनका बाहय कटकत्व असे परी ॥७९॥
धर्मगुणीं सिद्ध यश अपेश ज्यांत तें नसे ।
यशें त्या तारिलें विश्व अवतारादि निश्चयें ॥८०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP