TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि|

साधन मुक्तावलि - प्रकरण ६ वें

’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.


अथ कारण - देहविवरणप्रारंभ:
॥ अथ कारण - देहविवरणप्रारंभ: ॥

श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
द्दश्य देहांत, लिंगदेह ॥ तेंचि आत्म्याचें, जाणा गेह ॥
वासनापरत्वें, आरोपें मोह ॥ उपाधीनें, कारण जडे ॥१॥
कारणामुळें, कारण देह ॥ नाम पडलें, घडतां स्नेह ॥
नीचा संगतीं, होतो मोह ॥ आत्मा तैसा, जिवामुळें ॥२॥
हलके झोपाळा, हालविती ॥ जीव मनानें, ऐशी गती ॥
भासे तैशी, आत्मस्थिति ॥ मृगजल भास, तैशीच कीं ॥३॥
खोटा आभास, टाकुनी ॥ स्थिरचि रहावें, उन्मनीं ॥
देखो जाणे, आत्मज्ञानी ॥ आत्मा अचंचल, तया दिसे ॥४॥
उदकीं जैसा, दीप प्रकाश ॥ लांबट हलतो, सावकाश ॥
तरी दीपज्योती, सूक्ष्मांश ॥ माया पसरोनी, दावीतसे ॥५॥
देह वैद्यकी, आवश्यक ॥ जाणावी ती, अति सम्यक ॥
देहग्रामींचे, ग्रामकंटक ॥ जाणोनि आत्मा, शोधिजे ॥६॥
केतकी भोंवते, कांटेकुटे ॥ राजाभोंवतीं, खलकरंटे ॥
आत्म्याभोंवतीं, षडिपूचे तंटे ॥ म्हणोनि प्रवेश, दुर्लभ ॥७॥
तया हटवुनी, मार्ग सुगम ॥ करावा प्रारंभीं, मोहोगम ॥
प्रवेश झालिया, न राहे गोम ॥ आत्मज्ञानीं, विसर्जनीं ॥८॥
ज्ञेय, ज्ञाता, आणि ज्ञान ॥ हीच त्निपुटी, स्थान मान ॥
ज्ञान्याचा होतसे, सन्मान ॥ अंतर्बाहय, सर्व लोकीं ॥९॥
अज्ञान निरसतां, होतें ज्ञान ॥ तिमिर नष्टांशें, होते प्रभान ॥
तैसें अज्ञानाचेंचि, होतें ज्ञान ॥ विवेक मुख्य, पाहिजे ॥१०॥
अज्ञान आणि, अंध:कार ॥ नाहीं सर्वथा, अपार ॥
किंचित् भावें, इतुका प्रकार ॥ न्यूनाधिक्य, मायागुणें ॥११॥
कोंवळें असतां, आम्र तुरट ॥ अल्प काळें, होती, अंबट ॥
पाडकालीं, मधुरवट । ऐसेचि वैचित्र्य, ज्ञानाचें ॥१२॥
ब्रम्हीं माया, जडि छाया ॥ नासकी माया, तैशीच काया ॥
न धरावी देहीं, ममता माया ॥ ज्ञानबलानें, निरशी तिला ॥१३॥
स्थूल, सूक्ष्म आणि कारण ॥ चवथा तोची, महाकारण ॥
चारी अवस्था, जाणल्यावीण ॥ अंतर्धान, न पावशी ॥१४॥
भूतमात्राशीं, जो जाणें ॥ तो कैसा, आपणाशीं, नेणें ॥
नेणिव तरी हें, असें कळणें ॥ तेंच जाणिव असे कीं ॥१५॥
मन प्रवर्ते, इंद्रियद्वारें ॥ तेंही बाहय, विषय अपारे ॥
असते जागृती, हें जरी खरें ॥ (तरी) निद्रा सुषुप्ती, तेथेंच कीं ॥१६॥
वृथाभास, घेऊनी, अंतरीं ॥ मन हें सूक्ष्म, कल्पना करी ॥
तेव्हां स्वप्नाच्या, अवस्थेवरी ॥ लिंगदेह मांडतसे ॥१७॥
जागृत स्वप्नीं, जाणिव एक ॥ दोघा सांधी, सुषुप्ती देख ॥
गाढ निद्रा तुरिया, विपरीत ॥ हयाचि अवस्था, लिंगदेहीं ॥१८॥
नेणिवचि असतां, जाणिव ॥ तरी मानला, विपरित भाव ॥
आपाआपुल्या, नसे ठाव ॥ अज्ञानत्वें, करोनियां ॥१९॥
नेणिव शंका, तुटतां फिटतां ॥ स्वस्वरूप, उमटे तत्वतां ॥
किटाळ जातां, अग्नीची स्वस्थता ॥ कारणदेह, जाणा ऐसा ॥२०॥
इति श्रीपरमामृते मुकुंदराजविरचिते कारणगदेहविवरणं नाम षष्ठ पंचमं प्रकरणं संपूर्णम् ॥ श्रीब्रम्हार्पणमस्तु ॥
सूचना.

सिद्धिं प्राप्तो यथा ब्रम्हा, तथाप्नोति निबोध मे ॥
समासेनैव कौंतेय, निष्ठा ज्ञानस्य या परा ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-09-10T15:11:24.5730000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

पूर

  • ना. पाण्याचा लोंढा , पातळी वाढणे ( पाण्याची ), वर चढणे ( प्रवाहाचे पाणी ); 
  • m  A Flood. Exuberance. A town or city. Usually in com. as कोल्हापूर, पंढरपूर. 
  • ना. विपुलता , वृद्धी , समृद्धी . 
RANDOM WORD

Did you know?

कोणता शब्द योग्य आहे ? नखाला जिव्हारी लागणे की जिव्हाळी लागणे?
Category : Dictionary
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site