विषम अलंकार - लक्षण ८

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


या श्लोकांत, परस्परांना अयोग्य अशा वस्तूंच्या मात्र खर्‍याखुर्‍या संबंधाचें कथन असूनही, या ठिकाणीं विषमालंकार आहे, असें (तुम्ही म्ह० जगन्नाथानें केलेल्या लक्षणावरून) म्हणण्याचा प्रसंग येईल. तुम्ही म्हणाल, “मग त्यांग काय बिघडलें ? ही गोष्ट आम्हांला इष्ट आहे.” पण तसें म्हणतां येणार नाहीं. कारण वस्तुस्थितीचें कथन हें लोकसिद्ध असल्याकारणानें, तो अलंकार होऊं शकत नाहीं. बाहेर (लोकांत) नसलेले पण कवीच्या प्रतिभनेंच केवळ कल्पिलेले पदार्थ, काव्यांत अलंकाराचे विषय होतात. तुम्ही (जगन्नाथ) म्हणाल. “जसें कमळ तसें मुख” इत्यादि वाक्यांत तरी साद्दश्य लोकसिद्ध असल्यामुळें व अशा ठिकाणीं तें साद्दश्य कवीच्या प्रतिभेनें निर्माण केलें नसल्यामुळें, त्याला तरी तुम्ही अलंकार कसें म्हणतां ?” पण हें तुमचें (म्ह जगन्नाथाचें) म्हणणेंही बरोबर नाहीं. साद्दश्यरूप कथवा साद्दश्याला उत्पन्न करणारा जो अभिन्न धर्म, (तो वस्तुत: अभिन्न नसून भिन्नच असतो) त्यांतील अभेदाचा अंश, हा कवीच्या केवळ प्रतिभेवरच अवलंबून असतो. कमळ व मुख यांच्यांतील शोभारूपधर्म, जाति वगैरेप्रमाणें, वस्तुत:एकच असतो, असें म्हणतां येणार नाहीं. जो जाति वगैरेसारखा धर्म वस्तुत: एकच असतो, असें म्हणतां येणार नाहीं. जो जाति वगैरेसारखा धर्म वस्तुत: एकच असतो, त्यानें उत्पन्न केलेलें साद्दश्य, अलंकाराच्या कक्षेच्या बाहेरचेंच असतें.
उदाहरण :---
‘कमळाप्रमाणें हिचें मुख एक द्रव्य आहे.’ (ह्या ठिकाणीं द्रव्यत्व हा जातिरूप साधारण धर्म, खरा व एकच असल्यानें, अलंकाराला कारण होऊं शकत नाहीं.) याचप्रमाणें, वरील ‘वनान्त: खेलन्ती’ या श्लोकांत सांगितलेली सीता व राक्षसिणी यांच्या संबंधाची अयोग्यता र्हासुद्धां कविकल्पनेनें निर्माण केलेली नसून लोकसिद्ध असल्यामुळें, तिला अलंकार म्हणतां येत नाहीं. वरील विवेचनावरून,
‘कुठें हें घोर अरण्य, आणि कुठें सोन्याची साखळी गळ्यात असलेला हा हरिण ? कुठें हा मोत्याचा हार, कुठें हा पक्षी व कुठें ही स्त्री ? कुठें तें सर्पराजाचें सुंदर कन्यारत्न व कुठें आम्ही; स्वत:च्या मनांत असलेला कसलाही अभिप्राय, विधाता गूढ रीतीनें प्रकट करून दाखवितो.” हें अलंकारसर्वस्वकारांनीं दिलेलें विषमाचें उदाहरणही खोडलें गेलें. हाच प्रकार कविप्रतिभेनें निर्माण न केलेल्या अर्थाच्या श्लोकांतही समजावा. (येथें शंकाकाराचा पूर्वपक्ष संपला.)
यावर आमचें (जगन्नाथाचें) म्हणणें असें :---
तुम्हाला वरील ‘वनान्त: खेलन्ती’ या श्लोकांतील अयोग्यत कल्पित नसल्यामुळें, त्यांत अलंकार वाटत नसेल तर, “कुठें ती फुलाप्रमाणें कोमळ अंगाची व चंद्रकलेसारखी सुंदर अशी सीता व कुठें राक्षसरूपी धगधगणार्‍या निखार्‍याच्या मध्यभागीं राहण्याचा तो भयंकर प्रकार.”
हें घ्या विषमाचें उदाहरण. ह्या ठिकाणीं केवल सीता व केवळ राक्षसिणी याचा संबंध अयोग्य असूनही तो कवीला सांगायचा नाहीं; पण फुलाचा नाजुकपणा व धगधगीत निखारा यांचा संबंध अयोग्य आहे, हें येथें कवीला सांगायचें आहे. व हा अर्थ लोकसिद्ध नसल्यामुळें, त्याकरतां कवीच्या प्रतिभेची आवश्यकता आहे; म्हणून येथें विषम अलंकार स्पष्टच आहे.
येथें रसगंगाधरांतील विषमालंकार हें प्रकरण समाप्त झालें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP