विषम अलंकार - लक्षण २

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


“इष्ट साधन म्हणून माहीत असलेल्या कारणापासून अनिष्ट कार्याची उत्पत्ति झाल्यास त्या ठिकाणीं अयोग्यता असते” असें वर म्हटलें होतें; त्या ठिकाणीं, अनिष्टकार्योत्पत्तिभि:’ हा समास एकशेषघटित असल्यानें एकशेषद्वंद्व समास समजावा. इष्ट नसलेलें तें अनिष्ट म्हणजे अनर्थ, व अनिष्ट कार्याची उत्पत्ति हाही अनर्थच. आतां इष्ट कार्याची उत्पत्तिन होणें म्हणजे अनिष्टकार्योत्पत्ति ती, व पुर्वींची अनिष्टकार्योत्पत्ति मिळून एक द्वंद्व झाला. त्या दोन उत्पत्तिव अनिष्ट कार्योत्पत्ति मिळून अनेक अनिष्टकार्योत्पत्ति होऊन एकशेष होतो, व त्या अनिष्टकार्योत्पत्तीपासून विषमालंकार होतो. वरील सर्व प्रकार सरळ भाषेंत सांगायचे म्हणजे असे :--- इष्ट कार्याची अनुत्पत्ति, व अनिष्ट कार्याची उत्पत्ति मिळून विषमाचा एक प्रकार. या प्रकारांतून एक एक मिळून दो भेद होतात; [म्हणजे (१) इष्ट कार्याची अनुत्पत्ति झाल्यानें होणारा एक प्रकार व (२) केवळ अनिष्ट कार्याची उत्पत्ति झाल्यानें होणारा दुसरा प्रकर] व मूळचा एक (म्ह० इष्ट कार्याची अनुत्पत्ति व अनिष्ट कार्याची उत्पत्ति) असे तीन भेद (वरील सर्व भेद जमेस धरून) झाले. इष्ट हें (१) स्वत:ला सुखाचें साधन वाटणार्‍या वस्तूची प्राप्ति, (२) स्वत:च्या दु:खाचें साधन वाटणार्‍या वस्तूंची निवृत्ति, (३) शत्रूंच्या दु:खाचें साधन वाटणार्‍या वस्तूंचि प्राप्ति, व (४) शत्रूला सुखाचें साधन म्हणून वाटणार्‍या वस्तूची निवृत्ति, असें चार प्रकारचें असतें, वरील चार प्रकार ध्यानांत घेता, इष्टाच्या अप्राप्तीनें होणार्‍या दोन भेदांचेही प्रत्येकीं चार प्रकार ध्यानांत घेता, इष्टाच्या अप्राप्तीनें होणार्‍या दोन भेदांचेही प्रत्येकीं चार प्रकार होतात. आतां अनिष्ट हें ९१) स्वत:ला दु:खकारक वाटणार्‍या वस्तूची प्राप्ति (२) शत्रूला सुखकारक वाटणार्‍या वस्तूची प्राप्ति व (३) शत्रूला दु:खाचें साधन वाटणार्‍या वस्तूचा नाश, असें तीन प्रकारचें. “स्वत:ला इष्ट असलेली वस्तु प्राप्त न होणें,” हा जो अनिष्टाचा चौथा प्रकार, तो या अनिष्टाच्या यादींत मोजलेला नाहीं; कारण तो इष्टाच्या अप्राप्तींत (वर० येऊन गेला आहे. अनिष्टाचे हे तीन प्रकार, अनिष्टप्राप्तीनें होणार्‍या भेदांतही होतात.
वरील विषमाच्या सर्व प्रकारांपैकीम नमुना म्हणून कांहीं प्रकार येथें दाखवतो. उदाहरण :---
“प्रियकराला घालवून देण्याकरतां, बालिकेनें रागावून त्याला कमळानें मारलें; पण तो त्या कमळरूपी मदनाच्या बाणानें घायाळ झाल्यानें, त्यानें लागलीच तिच्या गळ्याला मिठी मारली.”

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP