विरोधमूलक अलंकार - लक्षण ५

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


दुसरी एक शंका अशी कीं, दोन जाति यांचा (आपापसांत) व दोन द्रव्यें यांचा (आपपसांत) विरोध हा विरोधालंकारच होऊं शकत नाहीं. कारण ‘कुसुमानि शराश्चन्द्रो वाडवो दु:खिते ह्रदि’ (ह्रदय दु:खीत झालें असतां, फुलें हीं बाण वाटतात; व चंद्र हा वडवाग्नि भासतो.) इत्यादि वाक्यांत, आरोपमूलक रूपक अलंकारच उठून दिसतो. (ह्या वाक्यांत) आरोप असतांनाही विरोधाभासच म्हणायचा असेल तर ‘मुखं चन्द्र: ।’ या ठिकाणींही तो आहे, असें म्हणा. तुम्ही म्हणाल, “अशा रीतीनें रूपकाच्या सर्वच विषयावर विरोधानें आक्रमण केल्यास रूपकाला स्वत:चा विषयच राहणार नाहीं. तेव्हां स्वत:च्या विषयांत रूपक विरोधाचा बाध करतें व गुणक्रिया वगैरे विरोधाचे स्वत:चे विषय असल्यामुळें, त्या विरोधाला आपली स्वतंत्र जागाही राहते;” पण या म्हणण्यांतहीं अर्थ नाहीं. कारण मग ‘कुसुमानि शारा;’ ‘मृणालववलयादि दवदहनराशि:०’ या जातिविरोधाच्या, व ‘चंद्रो वाडव: ।’ ‘शंकरचूडापगापि कालिन्दी’ या द्रव्यविरोधाच्या उदाहरणांत तुम्हांला मान्य असलेल्या विरोधाचा लोप होण्याचा प्रसंग येईल. या शंकेवर आमचें उत्तर असें :---
या अलंकारशास्त्रांतल्या अलंकारंच्या वर्गांत, जो अलंकार ज्या ठिकाणीं, सह्रदयांच्या अंत:करणांत चमत्कार उत्पन्न करीत असेल त्या ठिकाणीं तोच अलंकार मानला पाहिजे ही गोष्ट निर्विवाद आहे.
या द्दष्टीनें पाहिलें असतां, ‘मुखं चन्द्र:’ या रूपकांत जरी विरोध भासत असला तरी तो, तेथें (आवर्जून) सांगण्यांची कवीची इच्छा नाहीं. तर चंद्राचें ठायीं असणारे ज आल्हादकत्व वगैरे सर्व गुण, त्यांची मुखाचें ठायीं प्रतीति होण्याकरितां, कवीला या वाक्यांत अमुखाशीं चंद्राचा अभेद सांगावयाचा आहे, व तो अभेदच वरील वाक्यांत चमत्कार उत्पन्न करणारा आहे, विरोध (वरील वाक्यांत) चमत्कार उत्पन्न करणारा नाहीं. उलट, असलेलाही विरोध, कवीला इष्ट असलेल्या अर्थाला अनुकूल नसल्यानें, दूषित झालेला आहे; म्हणून त्याला विरोध अलंकार म्हणतां येत नाहीं; विरोध या वाक्यांत हजर आहे, या गोष्टीला फारशी किंमत नाहीं.
‘कुसुमानि शरा: ।’ या श्लोकांत विरहिणीच्या अवस्थेचा अदभुत प्रकार सांगण्याची कवीला इच्छा सलल्यानें, त्याला अनुकूल व्हावा म्हणून या श्लोकांत गर्भित असलेला आर्थ विरोधसुद्धां उठावांत दिसतो; म्हणून या ठिकानीं विरोधच अलंकार आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP