परिणाम अलंकार - लक्षण १

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


विषयी यत्र विषयात्मतयैव प्रकृतोपयोगी न स्वातन्त्र्येण, स परिणाम: ॥

ह्या अलंकारात विषयाचा, विषयीच्या ठिकाणीं होणारा अभेद प्रकृतकार्याला उपयोगी पडतो. रूपक अलंकारांत असें होत नाहीं; हा रूपकाहून ह्याचा (परिणामाचा) भेद.
परिणामालंकाराचें हे उदाहरण :---
“ह्या अपार संसारांत, घोर विषयरूपी अरण्याच्या मार्गांवर विश्रांति न घेतां सतत भटकून थकलेल्या मंदबुद्धि अशा माझा, चोहोंबाजूंनीं घेरणार्‍या संतापाला, यमुनेच्या तीरावर राहणारा श्रीहरिरूपी नूतनतमाल वृक्श, दूर करो,” ह्या ठिकाणीं तमालवृक्ष श्रीहरिरूप होऊनच संसाराचा ताप दूर करण्यास समर्थ होतो. मार्गावर थकलेल्या लोकांचा संताप हरण करीत असल्यामुळें, व रमणीय शोभेचा आधार असल्यामुलें, ह्या ठिकाणीं तमालवृक्ष विषयी म्हणून सांगितला आहे. ह्या श्लोकांतील पंरिणामालंकार, समानाधिकरण (म्हण्जे ज्यांतील विषय आणि विषयी एकच विभक्तींत आले आहेत असा) व वाक्यामध्यें आलेला. असा आहे. समासामध्यें आलेल्या परिणामालंकाराचें उदाहरण :--- “महर्षिव्यासपुत्र शुकदेवाचें वचनरुपी अमृत सतत ऐकून अभिन्यूचा मुलगा राजा परिक्षित परम आनंद पावला”
विषय व विषयी भिन्न विबक्तींमध्यें असलेल्या परिणामालंकाराचें हें उदाहरण :---
“आपल्या तेजस्वी वदनाच्या योगानें जी पूर्वचंद्रयुक्ता (भासते) व आपल्या शुद्ध स्मिताच्या योगानें जी चांदण्यानें शोभणारी शुक्लपक्षांतील रात्रच वाटते अशी ही सुंदर स्त्री ह्या पृथ्वीतलावर कोणाच्या संतोषाला कारणीभूत होणर नाहीं ?”
ह्या श्लोकांत, ती सुंद स्त्री सर्वांच्या संतोषाला कारणीभूत होईल असें म्हटल्यानें, विरही जनांचा संतोष उत्पन्न करणारी अशीही ती होईल. असा अर्थ निघतो. पण ह्या श्लोकांत विषयीं असलेली जी शुक्ल पक्षांतील रात्र तिच्या (स्वत:च्या) द्दष्टीनें पाहतां तो अर्थ बाधित होतो. पण तो अर्थ सुंदर स्त्रीच्या द्दष्टीनें बरोबर जुळतो; आणि म्हणूनच तेथें परिणामालंकार झाला आहे. असा हा परिणामालंकार, ह्या ठिकाणीं, एकमेकांची अपेक्षा बाळगणार्‍या अनेक पदार्थां (च्या आरोपा) मुळें सावयव झाला आहे. (म्हणजे याला सावयव परिणमालंकार म्हणतां येईल.) ह्या श्लोकाच्या पहिल्या दोन चरणांमध्यें, या सावयव परिणामालंकाराचे दोन अवयव भिन्न विभक्तींमध्यें आलेले आहेत: व श्लोकाच्या शेवटच्या दोन चरणांमध्यें आलेला परिणामालंकाराचा अवयव समानधिकरन आहे. (म्हणजे त्यांतील विषय व विषयी समान विभक्तींत आले आहेत.)

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP