TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

उदाहरणालंकार - लक्षण २

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


लक्षण २
या अलंकाराचें दुसरें उदाहरण-
“ ज्याप्रमाणें  शंकराच्या ठिकाणीं ( नसता ) पराक्रम दाखवूं पहाणार्‍या गर्विष्ट मदनाचा नाश झाला, त्याप्रमाणें अत्यंत बलिष्ट असलेल्या पुरुषाशीं, अविचारीपणानें वागणारा दुष्ट बुद्धीचा मनुष्य नाश पावतो. ”
ह्या श्लोकांत बलिष्ठ ( पणा ) , अविचारी ( पणा ) हे दोन सामान्य पदार्थ आहेत; आणि शंकर ( ता ) व वीर ( ता ) हे दोन ( अनुक्तमें ) त्या सामान्यांचे विशेष आहेत. त्याचप्रमाणें, दुष्ट बुद्धीचा मनुष्य ह्यांतील दुष्ट बुद्धि ही गौण ( पदार्थ ) म्हणजे विशेषण, व दुष्ट बुद्धी असलेला पुरुष हा विशेष म्हणजे प्रधान आहे; हे दोन पदार्थ ( ह्या श्लोकांत ) सामान्य आहेत; व गर्व आणि मदन हे दोन पदार्थ त्या दोन सामान्यांचे ( अनुक्रमें ) विशेष आहेत.
अथवा, या अलंकाराचें हें तिसरें उदाहरण-
“ सद्‍गुणी मनुष्य, विपत्तींत सांपडला तरी दुसर्‍यावर फार मोठा उपकार करतो. मूर्च्छित झालेला अथवा मेलेला पारा या बाबतींत दृष्टांत म्हणून सांगतां येईल. ”
ह्या श्लोकांतील निदर्शन ह्या शब्दाऐवजीं दृष्टांत हा शब्द घालून-सुद्धां उदाहरण अलंकार करतां येईल.
ह्या अलंकारांत, इव वगैरे शब्दांचा प्रयोग केला असतां, सामान्य-रूप पदार्थ प्रधान होतो; व एक वाक्य होते. परंतु निदर्शन वगैरे शब्दांचा प्रयोग केल्यास विशेषाचें प्राधान्य होते; व दोन वाक्यें निराळीं होतात. असा या दोन वाचक शब्दांच्या बाबतींत फरक आहे

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:58.3130000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

inner salt

  • पु. अंतःक्षार 
RANDOM WORD

Did you know?

श्रावण महिन्यांत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक कां करावा? त्याचे पुण्य काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.