मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीगणेशाची सहस्त्र नामे|
श्लोक २६ ते ३०

सहस्त्र नामे - श्लोक २६ ते ३०

श्रीगणेशाच्या सहस्त्रनामांचे मराठी अर्थ.


ब्रह्माण्ड-कुम्भ: चिद्‌-व्योम-भाल: सत्यशिरोरुह: ।
जगत्‌-जन्म-लय-उन्मेष-निमेष: अग्नि-अर्क-सोम-दृक्‌ ॥२६॥
१४४) ब्रह्माण्डकुम्भ---हत्तीच्या मस्तकावरील उंचवंटयांना कुंभ म्हणतात. परिपूर्ण ब्रह्माण्डच ज्याचे कुंभ आहेत तो.
१४५) चिद्‌व्योमभाल---चिन्मय असे आकाश (चिदाकाश) हेच ज्याचे भाल अथवा कपाळ आहे.
१४६) सत्यशिरोरुह---सत्यलोक (चतुर्दशभुवनातील सर्वात वरचा लोक) हेच ज्याचे शिरोरुह म्हणजे केस आहेत असा.
१४७) जगज्जन्मलयोन्मेषनिमेष---जगत्‌-जन्म-लय-उन्मेष-निमेष: उन्मेष म्हणजे डोळे उघडणे आणि निमेष म्हणजे डोळे मिटणे. ज्याने डोळे उघडताच जगताचा जन्म होतो आणि डोळे मिटताच जगाचा लय होतो असा तो.
१४८) अग्न्यर्कसोमदृक्‌---अग्नी, सूर्य (अर्क) व चंद्र (सोम) हे ज्याचे डोळे आहेत असा.
गिरीन्द्र-एकरदः धर्म-अधर्म-ओष्ठः सामबृंहितः ।
गिरीन्द्र-एकरद: वाणीजिह्व: वासवनासिक: ॥२७॥
१४९) गिरीन्द्रैकरद---गिरीन्द्र म्हणजे मेरूपर्वत किंवा हिमालय हाच ज्याचा एक दात आहे असा.
१५०) धर्माधर्मोष्ठ---धर्म आणि अधर्म हे ज्याचे दोन ओठ आहेत. ज्याच्या वाणीतून धर्म आणि अधर्म स्पष्ट होतात तो.
१५१) सामबृंहित---सामवेदरूप गर्जना करणारा. सामवेदाचा उच्चार हीच ज्याची गर्जना आहे. सामांनी वाढणारा.
१५२) ग्रहर्क्षदशन---ग्रह, नक्षत्रे हे ज्याचे दात आहेत.
१५३) वाणीजिह्व---परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी या चार प्रकारच्या वाणी हीच ज्याची जीभ आहे. पुराण-न्याय-मीमांसा-अथर्ववेद-ऋग्वेद-यजुर्वेद ज्याच्या जिभेवर आहेत असा.
१५४) वासवनासिक---वासव म्हणजे इन्द्र. इन्द्र हेच ज्याचे नाक आहे.
कुलाचलांस: सोमार्कघण्ट: रुद्रशिरोधर: ।
नदीनदभुज: सर्प-अङ्गुलीक: तारकानख: ॥२८॥
१५५) कुलाचलांस---महेन्द्र, मलय, सह्य, शुक्तिमान्‌, ऋक्ष, विन्ध्य आणि परित्राय हे पर्वतकुल ज्याचे खांदे आहेत. असा तो. (असं म्हणजे खांदे)
१५६) मोमार्कघण्ट---चन्द्र व सूर्य ज्याच्या खांद्यावरील घण्टास्वरूप आहेत असा.
१५७) रुद्रशिरोधर---शिरोधरा म्हणजे मान. रुद्र हीच ज्याची मान असा तो.
१५८) नदीनदभुज---गंगादी नद्या व शोणभद्रसारखे नद (मोठी नदी) हे ज्याच्या भुजा आहेत.
१५९) सर्पाङ्गुलीक---शेष आदि नाग ज्याची बोटे आहेत असा तो.
१६०) तारकानख---स्वयंप्रकाशी तारका ही याची नखे आहेत असा.
भ्रमध्य़संस्थितकर: ब्रह्मविद्यामदोत्कट: ।
व्योमनाभि: श्रीहृदय: मेरूपृष्ठ; अर्णव-उदर: ॥२९॥
१६१) भूमध्यसंस्थितकर---भुवयांच्या मध्यभागी ज्याची सोंड आहे असा.
१६२) ब्रह्मविद्यामदोत्कट---ब्रह्मविद्यारूपी मदस्रावाने ज्याचे गंडस्थल ओसंडून वाहत आहे असा.
१६३) व्योमनाभि---आकाश हेच ज्याचे नाभिस्थान आहे.
१६४) श्रीहृदय---ऋग्वेद-यजुर्वेद-सामवेद या वेदत्रयीला श्री असे म्हणतात. ही वेदत्रयी ज्याचे हृदय आहे असा. श्री: किंवा लक्ष्मी.
१६५) मेरुपृष्ठ---सुमेरुपर्वत ही ज्याची पाठ आहे असा.
१६६) अर्णवोदर---ज्याच्या उदरात सर्व समुद्र सामावले आहेत असा तो. (अर्णव = समुद्र) समुद्र हे उदर असणारा.
कुक्षिस्थ-यक्ष-गन्धर्व-रक्ष: किन्नरमानुष: ।
पृथ्वीकटि: सृष्टिलिङ्ग: शैलोरु: दस्र-जानुक: ॥३०॥
१६७) कुक्षिस्थयक्षगन्धर्वरक्ष: किन्नरमानुष---यक्ष-गन्धर्व-राक्षस-किन्नर आणि मनुष्य इ. जीव ज्याच्या कुशील विसावले आहेत. (अप्सरा-गंधर्व-यक्ष-राक्षस-किन्नर-पिशाच-गुह्यक आणि सिद्ध ह्या देवयोनी आहेत)
१६८) पृथ्वीकटि---पृथ्वी ही ज्याची कंबर आहे असा तो.
१६९) सृष्टिलिङ्ग---सृष्टी हे ज्याचे लिंग आहे किंवा ज्याच्या जननेंद्रियस्थानी सर्व प्रजा आहे.
१७०) शैलोरू---पर्वत हे ज्याच्या मांडया आहेत. (शैल = पर्वत, ऊरू = मांडया)
१७१) दस्रजानुक---अश्विनीकुमार हेच ज्याचे गुडघे आहेत. (अश्विनीकुमार म्हणजे अश्चिनौ. हे एक देवतायुम्म आहे. हे देव नेहमी जोडीनेच असतात. हे देवांचे कुशल वैद्य आहेत. ते शक्तिशाली व चपळ आहेत. ‘द्स्रा’ हे त्यांचे विशेषण आहे. दस्रा म्हणजे चमत्कार करणारे, विपत्तींमधून प्राणिमात्रांचा उद्धार करणे हे त्यांचे प्रधानकार्य आहे. कोणत्याही प्रकारच्या अपघात प्रसंगी हे दोघे प्राण वाचविण्यासाठी धावून जातात. ते सर्वत्रसंचारी आहेत.) जानु = गुडघा.

N/A

References : N/A
Last Updated : July 19, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP