श्रीगणपतीचीं पदें

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पद १ लें.
नमिला तो गणराजा । आजि मी, जो प्रभु धांवे दासांचा काजा ॥ धृ० ॥
दनिजनांचा पालक साचा, आई बाप जगाचा । साधि निरंतर निजजन काजा ॥ न० ॥१॥
लाजे रति पति पाहुनि ज्या अति, आत्मज जो शंभूचा । दोंहीं भागीं ऋद्धि बुद्धि भाजा ॥ न० ॥२॥
गातां वाचे नाम जयाचें, होय उत्साह मनाचा । निशिदिनि आवडे संत समाजा ॥ न० ॥३॥
जगताचा धणि, देव मुकुटमणि जो कां जिवन जिवाचा । पालक कृष्णसुताचा माझा ॥ न० ॥४॥

पद २ रें.
गणराया तुज वराया रे आवडी मना ॥ धृ० ॥
मंगलमूर्ति, त्रिजगिं तुझी कीर्ति । रक्षिसि तूं भक्त जना ॥ रे आव०॥१॥
सुप्रसन्न होईं आत्मभक्ति देईं । पार्वतिच्या नंदना ॥ रे आव० ॥२॥
येइं बा उदारा, चरणिं देइं थारा । करितों मी वंदना ॥ रे आव० ॥३॥
विन्घसमुहवारीं, कृष्णसुता तारीं । हरिं भव बंधना ॥ रे आ० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP