श्रीगुरुबोध ग्रंथ - षष्ठ प्रकरण

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

॥ श्रीगणेशायनम: ॥ नित्य गूरूजवळीं असावें । न समजे तें पुसावें । दुसरीकडे नसावें । अंत:करण ॥१॥
सद्‌गुरुचरणीं अनन्य शरण । त्यासि न बाधे जन्ममरण । पदोपदीं गुरुस्मरण । करीत जावें ॥२॥
गुरुदेवां एकचि मानावें । द्वैतभावासि न ठेवावें । अद्वैत ज्ञान अनुभवावें । त्यांचिया कृपें ॥३॥
मूळस्वरूप निविकार निविकार । सद्‌गुरु अवतार साकार । कमक आणि अलंकार । एक जैसे ॥४॥
व्हावया जगाचा उद्धार । घेतला भगवंतें अवतार । श्रीसद्‌गुरुरूपें साचार । प्रगट झाला ॥५॥
ज्यावरी गुरुकृपा झाली । त्याच्या घरीं मुक्ति आली । देहबुद्धि ते निमाली । अभ्यासयोगें ॥६॥
आतां तुवां एकचि करावें । दिसे त्याचें मूळ धरावें । मूळ शोधितां बरवें । आपणचि होय ॥७॥
जें जें डोळियांसि दिसे । जें का मनामाजी भासे । त्या सर्वांचें मूळ असे । आपणचि ॥८॥
द्दश्यभास व्हावया कारण । आपुलें घडलें विस्मरण । त्यायोगें झांकला आपण । आनंदरूप ॥९॥
मुळीं उदक निर्मळ । वरी उत्पन्न झालें शेवाळ । तैसा आपणावरी अज्ञान मळ । भासों लागे ॥१०॥
विचारें अज्ञानातें पाहतां । मुळींच नाहीं तत्वतां । एक आपण असे आयता । आहेपणें ॥११॥
तेंचि आहेपण धरावें । पदार्थमान सोडावें । कल्पनाबंधन तोडावें । आत्मनेटें ॥१२॥
मुळीं समुद्र निश्चळ असे । वायुवेगें लहरी भासे । वायु थारतां न दिसे । तरंगभान ॥१३॥
तैसें आत्मविस्मृतीच्या योगें । देहासह विश्व भासों लागे । यास्तव सर्वांचें मूळ मागें । आपण होइजे ॥१४॥
‘मी देह’ कल्पना सोडीं । अखंड आनंदातें जोडीं । अद्वैत साम्राज्याची गोडी । अंगें घेईं ॥१५॥
आजिपासूनि श्रमलासी । आतां भोगीं आत्मसुखासी । कळिकाळाच्या भयासी । भिऊं नको ॥१६॥
सांगितलें तें लक्षीं धरीं । रात्रदिवस अभ्यास करीं । तरीच तूं मोक्षमंदिरीं । प्रविष्ट होसी ॥१७॥
जरी अभ्यासातें सोडिसी । तरी मन कल्पील विषयांसी । त्याचिवेळीं च्युत होसी । स्वरूपापासोनि ॥१८॥
यास्तव अभ्यासचि करावा । आत्मा धारणेनें धरावा । प्रपंचसागर तरावा । निमिषमात्रें ॥१९॥
सर्व व्यवहार करितां । अभ्यासा नियम करिती । प्रात:काळीं करावा म्हाणती । कोणी सायंकाळीं बोलती । ऐसियापरी ॥२१॥
ही सर्वथा नागवण । ऐसें न करावें जाण । पदोपदीं अभ्यास पूर्ण । करीत जावा ॥२२॥
तो अभ्यास कसा करावा । कथितों आईंक बरवा । पूर्वीं श्रवण केला तुवां । परी पुन: सांगतों ॥२३॥
इति श्रीगुरुबोध ग्रंथ । श्रवणें लाभे मोक्षपंथ । मननाभ्यासें श्रीभगवंत । ह्रदयीं भेटे ॥२४॥
इति श्रीगुरुबोधे षष्ठ प्रकरणं संपूर्णम्‌ ॥२६॥ श्रीराम ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP