संतसंगाच्या महिमेचा अभंग - अभंग १४४

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

१४४.
धन्य धन्य धन्य सज्जनाचा संग । ज्ञान भक्तिरंग रंगावया ॥१॥
रंगावया मन चैतन्यस्वरूपीं । नाहीं दुजा ओपी ज्ञान ऐसें ॥२॥
ज्ञान ऐसें जागें जयाचे ह्रदयीं । नित्य त्याचे पायीं ठेवूं माथा ॥३॥
ठेवूं माथा अहंकार निरसोनी । सेवा संपादूनी राहूं तेथें ॥४॥
राहूं तेथें मन सर्वदा विश्रांती । संसाराची खंती आठवेना ॥५॥
आठवेना एका आपणांवांचोनी । जनीं मनीं वनीं घनदाट ॥६॥
घनदाट सुखस्वरूप आपुलें । अंतरीं धरिलें आत्मभावें ॥७॥
आत्मभावें निज दर्शनाचा लाभ । दिधला स्वयंभ गुरुराया ॥८॥
गुरुराया स्वामी ! समर्था ! वैष्णवा !। द्यावी निज सेवा कृष्णदासा ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : June 08, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP