संत नामदेव रचित - लंबोदरा तुझा शोभे शुंडादं...

पूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे.


लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड । करीतसे खंड दुश्चिन्हांचा ॥१॥
चतुर्थ आयुधें शोभताती हातीं । भक्ताला रक्षिती निरंतर ॥२॥
भव्य रूप तुझें उंदीरवाहना । नमन चरणा करीतसे ॥३॥
तुझें नाम घेतां दोष जळताती । कळिकाळ कापती तुझ्या नामें ॥४॥
चौदा विद्या तुझ्या कृपेनें येतील । मुके बोलतील वेदघोष ॥५॥
रुणझुण पायीं वाजताती वाळे । ऐकोनि भुलले मन माझें ॥६॥
भक्तवत्सला ऐकें पार्वतीनंदना । नमन चरणां करितसे ॥७॥
नामा म्हणे आता देई मज स्फूर्तिं । कर्णितसे कीर्ति कृष्णजीची ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : July 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP