TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

चुडालाख्यान सार - पद २५१ ते ३००

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


कवी - हंसराज स्वामी
कुंभक करी, जसजसें बोले, ‘बरवेंच’ तो म्हणत गेला ॥
आग्रह निग्रह सुटला, भाव दुजा नच मनीं कधीं आला ॥२५१॥
घेउनि अशी परिक्षा, कुंभक परतोनि येइ गुंफेसी ॥
आतां काय करावें, स्त्रीसान्निध्यें बघूं स्थिती कैसी ॥२५२॥
चिंतातुर होउनिया कुंभक एके दिनीं बळें बसला ॥
काय तुम्हांसी झालें, पाहुनि ऐसें तयास नृप वदला ॥२५३॥
काय करूं मी राया आतां, मम पूर्व कर्म ओढवलें ॥
आजचि संध्यासमयीं, येइल स्त्रीदेह मजसि शापबळें ॥२५४॥
दुर्वास कुचेष्टा मी केली मागे, तयेंच शाप दिला ॥
‘वर्षानंतर होशिल स्त्री’ म्हणुनि, तोच दिवस हा आला ॥२५५॥
दुर्वासास विनवितां, दिधला उ:शाप कीं पुन्हां मजला ॥
दिवसा नर, रात्री तूं नारी होशील, काय करु याला ॥२५६॥
इतुकेंच ना म्हणे तो राजा, गुरुराय कासया चिंता ॥
होणार चुकेना कीं, शोक कशासी करीतसा आतां ॥२५७॥
देह असो स्त्रीची वा पुरुषाचा, काया आत्मया तेणें ॥
आत्मा तो होइल कां आत्मी, स्त्रीदेह त्यास आल्यानें ॥२५८॥
मी काय आपणासी उपदेशूं, घेतलें दिसे सोंग ॥
माझा निश्चय बघण्या, शोकरसाचा करीतसा ढंग ॥२५९॥
कुंभक मनीं सकजला ! रायाचा निश्चयो न डळमळला ॥
तरि प्रत्यक्ष स्त्रीचें घेउनियां रूप, हालवूं याला ॥२६०॥
राया पहा पहा रे गेला दिनराज सूर्य अस्ताला ॥
मजला स्त्रीचे अवयव अंकुरले, घात निश्चयें झाला ॥२६१॥
लावण्याची खाणी तरुणी, रायापुढें उभी ठेली ॥
नाम मदनिका, पाहुनि, नाहीं तिळ भूप-वृत्ती बावरली ॥२६२॥
राया आज उभयतां, एके शयनीं कसें निजूं न सुचे ॥
झाला वियोग आतां, स्त्री मी, तूं पुरुष, हें जमे कैचें ॥२६३॥
राजा म्हणे विनवुनी मी आत्मा, मज न भेद हा स्फुरतो ॥
भितीवर नर-नारी-चित्र, तसा भास हा मला गमतो ॥२६४॥
भितीविण काय असे ? स्त्री पुरुषादीक द्दश्य तो भास ॥
स्त्री देह तुम्हा आला, गुरुवांचुनि अन्य ना दिसे खास ॥२६५॥
मातेपाशीं निजले बाळ, तया काय काम बुद्धी ये ॥
शयनीं तुझ्या निजे मी, पदराखालींच गे गुरू माये ॥२६६॥
जरि पुरुषबुद्धि मजला, गेली मातींत आत्मबुद्धी ती ॥
पुरुषत्व नसें तेथें, कोण अपेक्षिल तरूण ही युवती ॥२६७॥
ऐकुनि नृपवचंनातें, कुंभक संतोषला मनीं भारी ॥
आलिंगिलें म्हणोनी, धन्य नृपा जाहलास अधिकारी ॥२६८॥
शंकर म्हणो तुला तरि, तो भुलला मोहिनीस पाहून ॥
ब्रह्मा सरस्वतीसी, विष्णू वृंदेस जाइ मोहून ॥२६९॥
उपमा तुला कशाची देऊ, इंद्रियजयो तुंबा केला ॥
विषयाची स्फूर्ति नसे, केवल आत्माच यापरी झाला ॥२७०॥
दिवसा कुंभक, रात्रीं नारि बने मदनिका, असें चाले ॥
एकत्र शयन करिती रात्रीं, षण्मास यापरी गेले ॥२७१॥
कुंभक विचार करिता झाला, बहु क्षीण जाहल्या वृत्ती ॥
अभ्यासबलें, याची विषयासी इंद्रियें न आकलिती ॥२७२॥
इंद्रिय वृत्ती असुनी नसल्या परि, आज दिसति रायांत ॥
प्रारब्धवशें चालन मिळतां, त्या केंचि शांत व्हाव्यात ॥२७३॥
विकृती मग होइलची, त्यानें नासेल नृप-समाधान ॥
कर्म अहंकाराचें, “मी करितों जाणणेंच” उत्थान ॥२७४॥
नसतां विषयाचा तो भोग, समाधान हेंहि एक उणें ॥
इंद्रियसमन नपुंसका सहजीं, साधू तयास कोण म्हणें ॥२७५॥
अंध न देखे, बहिरा ऐकेना, म्हणुनि काय ते ज्ञानी ॥
संकल्प नसे म्हणुनि मूढासी निर्विकल्प कोण गणी ॥२७६॥
रायास भोग न घडे, यास्तव उघडें दिसे समाधान ॥
तो नित्यमुक्त जाणा, जो न ढळे सर्व विषय भोगून ॥२७७॥
चिदचिद्‌ग्रंथी तुटली, ती करिता एक पुनरपी न जडे ॥
पूर्ण समाधान वसे, भलतें देहा मनास कांहीं घडे ॥२७८॥
ऐसा विचार करुनी, दुसराची बेत कुंभकें रचिला ॥
एकांत पाहुनी मग रायासी बोलतां कसा झाला ॥२७९॥
रात्रीं स्त्री देह मला, तेव्हांचा समय कठिण मी जाणे ॥
निद्रा न ये सुखानें, कामेच्छा आवरूं किती भेणें ॥२८०॥
मज कामरोग जडला, औषध नरसंग केधवां प्राप्त ॥
ऐसी तळमळ मजला, नित्य तयानेंच राहि संतप्त ॥२८१॥
राजा म्हणे गुरूजी, आपण नि:संग काम कोठोनी ॥
माझें धैर्य अशानें, पाहतसा का कसास लावोनी ॥२८२॥
अपुलीच कृपा झाली निजतृप्ती, नाश तीप्रती नाहीं ॥
कृत्रिम तृप्ती वांछिल, कोण असा मूर्ख या जगीं पाही ॥२८३॥
कुंभक वदे असो दे. बोल तुझे फोल वाटती मजला ॥
ज्या सर्पदंश झाला तीव्र, मधु होय तेंच कटु त्याला ॥२८४॥
मज कामव्याळ डसला, वचनामृत तव विषापरी भासे ॥
पुरुषसुखाविण मजला, रात्रीं क्षणएक चैन पडत नसे ॥२८५॥
राजा विनवी स्वामी, ब्रह्मविदासी सदोष कोण म्हणे ॥
इच्छा पुरवुनि घ्यावी, मन माने तेच सद्रुरू करणें ॥२८६॥
देव ऋषी, यक्ष, पितर यांतुनि वाटेल जो तुम्हास बरा ॥
त्यासी वरा, नको हे तरि, आणा येथ पुरुष कुणि दुसरा ॥२८७॥
प्रहरच चार चिसाचें, संगतिचा लाभ आपुल्या घ्यावा ॥
कुंभक म्हणे नृपा तूं प्रियतम माझा, दुजा कसा व्हावा ? ॥२८८॥
सहन न वियोग मातें, क्षणही लोटूं नको मला दूर ॥
राया तूंचि वरी मज, लावूंया लग्न हें उचित फार ॥२८९॥
ऐकुनि कामुक बोलां, मुर्च्छित मग भूप भूवरी पडला ॥
सावध झाल्यानंतर कुंभक वदला, असा कसा भ्रमला ॥२९०॥
राजा वदे, तुम्ही मज मातेसम सद्नुरो कृपा करणें ॥
अन्याय लेकुराच्या हातीं घडणें, असें कसें होणें ॥२९१॥
ऐसें कधीं न झालें मागें, होणार तें कधीं न पुढें ॥
मृत्यू याहुनि बरवा, स्वामी घालूं नका असें कोडें ॥२९२॥
कुंभक म्हणे नृपाला बडबडशी काय लागलें वेड ॥
गुरु काय समजशी हा देह, तुझा औट हात कां पेड ॥२९३॥
गुरुशिष्यपणा कोठें निजरूपीं, फिरुनि जीवबुद्धीशीं ॥
झाला भ्रम अज्ञानें, भिन्नत्वानेंच यापरी वदशी ॥२९४॥
जें जें उपाधियोगें घडतें, अभिमान घेतसे जीव ॥
संचित तें, आतां जें भोगी प्रारब्ध तेंच सोलीव ॥२९५॥
जें वर्तमान कालीं घडतें अभिमानपूर्ण क्रियमाण ॥
कर्तुत्व तुझ्या ठायीं कोठुनि, नि:संग आत्मया पूर्ण ॥२९६॥
आपण असंग ऐसें कळतां, संचित जळेच परिपूर्ण ॥
नि:संशय आपण नच कर्ता कळतांच, जाय क्रियमाण ॥२९७॥
प्रारब्ध भोगल्याविण, कल्पांती नाशची नसे त्यास ॥२९८॥
ज्ञानी वा अज्ञानी न म्हणे प्रारब्ध, भोग देइ बळें ॥
स्त्रीदेह मला आला प्रारब्धानेंच, कां तुला नकळे ॥२९९॥
टाकुनि राज्य, वनीं तूं खाशी फलमूल हेंच प्रारब्ध ॥
विष्णू वृंदेसि रतें, ब्रह्मा कन्येशि हेंच प्रारब्ध ॥३००॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-04-16T10:23:49.6830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ठणक्‍यास दणका लागतो

  • ठणकून बोलणारास शासन पाहिजे 
  • जो फार जोरजोराने बोलूं लागतो, त्‍यास चांगले पक्‍के भेटले म्‍हणजे त्‍याचे काही चालत नाही. 
RANDOM WORD

Did you know?

गणपतीला २१ दुर्वा वाहतांना काय मंत्र म्हणावा ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site