मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|करुणाष्टकें| अष्टक ३ करुणाष्टकें अष्टक १ अष्टक २ अष्टक ३ अष्टक ४ अष्टक ५ अष्टक ६ अष्टक ७ अष्टक ८ सवाया करुणाष्टकें - अष्टक ३ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ अष्टक ३ Translation - भाषांतर नसे भक्ति ना ध्यान ना ज्ञान कांहीं । नसे प्रेम हें राम विश्राम नाहीं । असा दीन अज्ञान मी दास तूझा । समर्था जनीं घेतला भार माझा ॥१॥रघूनायका जन्मजन्मांतरींचा । अहंभाव छेदोनि टाकी दिनाचा । जनीं बोलती दस या राघवाचा । परी अंतरीं लेश नाहीं तयाचा ॥२॥रघूनायका दीन हातीं धरावें । अहंभाव छेदोनियां उद्धरावें । अगूणी तयालगिं गूणी करावें । समर्थें भवोसागरीं ऊतरावें ॥३॥किती भार घालूं रघूनायकाला । मजकारणें शीण होईल त्याला । दिनानाथ हा संकटीं धाव घाली । तयाचेनि हे सर्व काया निवाली ॥४॥मला कायसा राम कैवल्यदाता । तयाचेनि हे फीटली सर्व चिंता । समर्था तया काय उत्तीर्ण व्हावें । सदा सर्वदा नाम वाचें वदावें ॥५॥दिनाचें उणें दीसतां लाज कोणा । जनीं दास दीजे तुझा दैन्यवाणा । शिरीं स्वामि तं राम पूर्णप्रतापी । तुझा दास पाहे सदा शीघ्रकोपी ॥६॥ जयजय रघुवीर समर्थ ॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP