मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|मारुती आरती संग्रह| जयदेव जयदेव जय अंजनितनया ... मारुती आरती संग्रह सत्राणें उड्डाणें हुंकार ... जयदेव जयदेव जय अंजनितनया ... जय जय बलभीमा बलभीमा । अगा... जयदेवजयदेव जयजय हनुमंता ।... सुखि निद्रा करी आतां स्वा... माया शोधाविषयीं तरलासि सम... अघटित भीमपराक्रम जय जय हन... जय देवा हनुमंता । जय अंजन... कोटीच्या ही कोटी गगनीं उड... सत्राणें उड्डाणें हुंका... जय जय अंजनिबाला । पंचारत... जयजय श्रीबलभीमा , मारुति... जयजय महा वीर धीर चिरंजिव ... आरती हनुमंताची - जयदेव जयदेव जय अंजनितनया ... रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला. Tags : aratiimarutiranganatha swamiआरतीमारुतीरंगनाथ स्वामी आरती हनुमंताची Translation - भाषांतर जयदेव जयदेव जय अंजनितनया ॥ आरति बोवाळूं तुज करुणानि लया ॥ध्रु०॥अभिवन प्रतापमहिमा न बोलवे वाणी ॥ फळ म्हणवुनियां धरिला बाळपणीं तरणी ॥अहिरावण महिरावण मारुनिया दोनी ॥ आणिला रघुविर केली अघटित हे करणी ॥१॥शत योजन एका उडुअणें उदधी ॥ लंघुनि क्रौंचा वधिलें अगणीत बळबुद्धी ॥ लंकाप्रवेश करुनी दशमुख अतिक्रोधी ॥ राक्षस गांजुनि केली त्वां सीताशुद्धी ॥२॥अशोकवन विध्वंसुनि वनचर निर्दळिले ॥ लंका जाळुनि पुच्छें रजनीचर छळिले ॥श्रीरामासह सैन्य कपिगण तोषविले ॥ म्हणती भीम पराक्रम हनुमंतें केले ॥३॥रामानुजसह सेने शक्ती लागतां ॥ द्रोणागिरि आणिला तो रवि-उदय नव्हतां ॥अमृतसंजीवनी देउनियां त्वरितां ॥ संतोषविले दशरथसुतमहिजा-कांता ॥४॥महारुद्रा हनुमंता देवा बलभीमा ॥ प्रियकर दास्यत्वें तूं होसी श्रीरामा ॥ शिव शंकर अवतारी निस्सीम सीमा ॥ नि:संगा निजरंगा मुनिमनविश्रामा ॥५॥ N/A References : N/A Last Updated : June 24, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP