मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|गणपती आरती संग्रह|
जयदेव जयदेव जय एकदंता ॥ आ...

गणपतीची आरती - जयदेव जयदेव जय एकदंता ॥ आ...

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


जयदेव जयदेव जय एकदंता ॥ आरती ओवाळूं सद्भावें आतां ॥ध्रु०॥
सिद्धिविनायक निजसुखदायक विघ्नेशा ॥ सुरवरवरदा परात्पर तरवर पुरुषा ॥
सेंदुरचर्चित लंबोदर सुंदर वेषा ॥ महिमा न कळे शेषा अगम्य अगदीशा ॥१॥
श्रीमन्मंगलमूर्ति देवा गजवदना ॥ गणपति मति मजला दे सद्विद्यासदना ॥
शरणागत प्रतिपाळक चाळक जगजिवना ॥ निजरंगा नि:संगा करुणानिधाना ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP