TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

भीमरूपी स्तोत्र - भीमरूपी महारुद्रा । वज्रह...

श्री समर्थ रामदास्वामींनी रचलेली ' भीमरूपी स्तोत्रे ' पठन केल्यास मारूतीचा आशीर्वाद प्राप्त होतो.


श्लोक
भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती । वनारि अंजनीसूता । रामदूता प्रभजना ॥१॥
महाबली प्राणदाता । सकळां ऊठवी बळें । सौख्यकारी शोकहर्ता । धूर्त वैष्णव गायका ॥२॥
दिनानाथा हरीरूपा । सुंदरा जगदंतरा । पाताल देवता हंता । भव्य शेंदूरलेपना ॥३॥
लोकनाथा जगन्नाथा । प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला पावना परतोषका ॥४॥
ध्वजांगें उचली बाही । आवेशें लाटला पुढें । कालग्रि कालरुद्राग्रि । देखतां कापती भयें ॥५॥
ब्रह्यांडें माईल नेणों । आवळे दंतपंगती । नेत्राग्रीं चालिल्या ज्वाळा । भृकुटी ताठिल्या बळें ॥६॥
पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटें कुंडलें वरी । सुवर्ण घटि कासोटी । घंटा किंकिणि नागरा ॥७॥
ठकारे पर्वताऐसा । नेटका सडपातळू । चपलांग पाहतां मोठें । महाविद्युल्लतेपरी ॥८॥
कोटिच्या कोटि उड्डाणें । झेंपावे उत्तरेकडे । मंद्राद्री-सारिखा द्रोणू । क्तोधें उत्पाटिला बळें ॥९॥
आणिला मागुती नेला । आला गेला मनोगतीं । मनासी टाकिले मागें । गतीसी तुळणा नसे ॥१०॥
अणुपासूनि ब्रह्मांडा । एवढा होत जातसे । ब्रह्मांडाभोंवत वेढे । वज्रपुच्छ घालवूं शके ॥११॥
तयासी तुळणा कोठें । मेरु मंदार धाकुटे । तयासी तुळणा कैशी । ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥
आरक्त देखिलें डोळां । गिळिलें सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे । भेदिल शून्यमंडळा ॥१३॥
भूत प्रेत समंधादि । रोगव्याधि समस्तहि । नासती तुटती चिंता । आनंदें भीमदर्शनें ॥१४॥
हे धरा पंधरा श्र्लोकी । लाभली शोभली भली । दृढ देहो नि:संदेहो । संख्या चंद्रकळा गुणें ॥१५॥
रामदासीं अप्रगणू । कपिकुळासी मंडणू । रामरूप अंतरात्मा । दर्शनें दोष नासती ॥१६॥

॥ भीमरूपी स्तोत्र संपूर्ण ॥१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-09-03T21:39:39.2730000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कुपरी

  • स्त्री. ( कों .) ( तेलांधदां ) ही काटकोनाकृति खुंटी असतें . ही ढोकाच्या खालच्या टोंकाशीं भोंक पाडुन त्यांत अडकवितात व या कुपरीच्या खालील टोकांत आडवी खिळीं घालुन त्या भोंवतालुन वेढें देउन नाडवळांस जोडतात . 
  • स्त्री. वाईट संगत - शर . 
RANDOM WORD

Did you know?

वारी म्हणजे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site