TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण|
अभंग ५१ ते ५५

पंचीकरण - अभंग ५१ ते ५५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


अभंग ५१ ते ५५
॥५१॥
बहुकाळ गेले देवासी धुंडितां ।
देव पाहों जातां जवळीच ॥१॥
जवळीच असे पाहतां न दिसे ।
सन्निधचि असे रात्रंदिवस ॥२॥
रात्रंदिवस देव सबाह्याभ्यंतरीं ।
जीवा क्षणभरी विसंबेना ॥३॥
विसंबेना परी जीव हे नेणती ।
जाती अधोगाति म्हणोनियां ॥४॥
म्हणोनियां सदा सावध असावें ।
विन्मुख नसावें राघवासी ॥५॥
राम पूर्वपुण्यें झालिया सन्मुख ।
मग तो विन्मुख होऊं नेणे ॥६॥
होऊं नेदी राम सर्वांगीं सुंदर ।
नित्य निरंतर मागें पुढें ॥७॥
मागें आणि पुढें सन्मुख चहूंकडे ।
भेटी हे निवाडे राघवाची ॥८॥
राघवाचि भेटी झाल्या नाहीं तुटी ।
मग कल्पकोटी चिरंजीव ॥९॥
चिरंजीव होय राघवीं मिळतां ।
जेथें पाहों जातां मृत्यु नाहीं ॥१०॥
नाहीं जन्म मृत्यु नाहीं येणें जाणें ।
स्वरूपीं राहणें सर्वकाळ ॥११॥
सर्वकाळ मन तदाकार होय ।
जरि राहे सोय श्रवणाची ॥१२॥
श्रवणाची सोय संताचेनि संगें ।
विचारेंचि भंगें अहंभाव ॥१३॥
अहंभावें राम भेटला नवजाय ।
जवळचि होय दुरी कैसा ॥१४॥
दुरि कैसा होय अहंभावें करी ।
जवळीच चोरी आपणासी ॥१५॥
आपणासी चोरी सबाह्य अंतरीं ।
आणि सृष्टिभरी नांदतसे ॥१६॥
नांदतसे अंत नाहीं तो अनंत ।
जाणतील संत अनुभवी ॥१७॥
अनुभावी जाणे तेथींचिये खुणे ।
येर विटंबणें वाढवील ॥१८॥
वाढवील सुख संतसज्जनांसी ।
रामीं रामदासीं भेटी झाली ॥१९॥
॥५२॥
योगियांचा देव मज सांपडला ।
थोर लाभ झाला एकाएकीं ॥१॥
एकाएकीं देव त्रैलोंक्यनायक ।
देखिला सन्मुख चहूंकडे ॥२॥
चहूंकडे देव नित्यनिरंतर ।
व्यापूनि अंतर समागमें ॥३॥
समागम मज रामाचा जोडला ।
वियोग हा केला देशधडी ॥४॥
देशधडी केला विवेकें वियोग ।
रामदासीं योग सर्व काळ ॥५॥
॥५३॥
जेथें जावें तेथें राम समागमीं ।
आतां कासया मीं खंती करूं ॥१॥
खंती करूं ज्याची तो समागमेंची ।
पाहतां सुखाची घडी होय ॥२॥
अहो देव खरा भूमंडळवासी ।
जातां दिगंतासी सारिखाची ॥३॥
सारिखाचि जनीं वनीं वनांतरीं ।
तो गिरिकंदरीं सारिखाची ॥४॥
सारिखाचि देव कदा पालटेना ।
राहे त्रिभुवना व्यापुनियां ॥५॥
व्यापुनियां दासा सन्निधची वसे ।
विचार विलसे रामदासीं ॥६॥
॥५४॥
रामोंविण देश तोचि तो विर्दश ।
विदेशाचा देश राम करी ॥१॥
राम भेटे ज्यासी तो नव्हे विदेशी ।
सर्व देश त्यासी आपुलेचि ॥२॥

आपुलेची देश या रामाकरितां ।
होय सार्थकता जेथे तेथें ॥३॥
जेथें तेथें राम देखतां विश्राम ।
संसारींचा श्रम आठवेना ॥४॥
आठवेना तेथें आठव विसर ।
दास निरंतर जैसा तैसा ॥५॥
॥५५॥
कल्पनेचा प्रांत तो माझा एकांत ।
तेथें मी निवांत बैसवीन ॥१॥
बैसवीन सुखरूप क्षण एक ।
पाहेन विवेक राघवाचा ॥२॥
राघवाचा पार अनंत अपार ।
नाहीं पारावार स्वरूपासी ॥३॥
स्वरूप रामाचें अत्यंत कोमळ ।
जेथें नाहीं मळ मायिकाचा ॥४॥
मायिकाचा मळ जाय ततक्षणें ।
रामाचें दर्शने दास म्हणे ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-03-31T01:51:06.5930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

धग

  • स्त्री. धास्ती ; हरकत ; आडकाठी . ' दहा वर्षे जगण्यास त्यांना अजून धग नाहीं .' - खेस्व ४० . ( ध्व .) 
  • स्त्रीपु . १ ( विस्तवाची ) आंच ; शेक ; झळ ; ताप . मी धक घेणार आहे . २ पेटलेला विस्तव ; अग्नि ; जाळ ; ज्वाला . ३ ( गर्व , प्रौढी , भावना इ० कांची ) गुरमी ; जहालपणा ; तीव्रता . ४ ( गो . ) संताप ; जळफळ . ५ ( कु . ) अंगांतील बारीक ताप ; कडकी . [ सं . दह चे द्वितीयपुरुषी आज्ञार्थी रुप . दग्ध हे ऋग्वेदांत जाळ या अर्थाने येते . - मसाप १ . २ . २२ ; बं . धक ; गु धक = तहान ; का . दग ] 
  • स्त्री. १ ( विस्तवाची ) उष्णता ; शेक ; आंच २ शेकोटी ; आगटी . ३ ( गो . ) संताप . क्रोध ; जळफळाट इतर अर्थी धक पहा . [ सं . दग्ध - धग्ग - धग - भाइ १८३४ ] 
  • ०खांक स्त्री. ( गो . ) क्षयरोग . [ धग + खांक ] 
RANDOM WORD

Did you know?

श्रीयंत्रातील चक्र आणि त्रिकोण कशाचे प्रतिक आहेत?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.