आरती रामदास - साक्षात शंकराचा । अवतार म...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


साक्षात शंकराचा । अवतार मारुतीचा ।
कलीमध्यें ते चि झाले । रामदासाची मूर्ती ॥१॥
आरती रामदासा । भक्तविरक्तईशा ।
उगवला ज्ञानसूर्य । उजळुनी प्रकाशा ॥ ध्रु.॥
वीस ही दशकांचा । दासबोध ग्रंथ केला ।
जड जीवा उद्धरीले । नृप शिवाजि तारीला ॥२॥
ब्रह्मचारी व्रत ज्याचें । रामरूप सृष्टि पाहे ।
कल्याण तिहीं लोकीं । समर्थ सदगुरुचे पाय ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP