मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें|स्फुट श्लोक|

स्फुट श्लोक - द्बयाष्टदीशा निज कोंदले र...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


द्बयाष्टदीशा निज कोंदले रे । हें संतकृपें गुज लाधलें रे ।
जन्मांतराचें मुळ शोधिलें रें । ब्रह्मार्पणीं मीपण बोधलें रे ॥१॥
वर्णाश्रमीची विधि चालवा रे । आशा दुराशा दुरि घालवा रे ।
साही जणाचे दिप मालवा रे । मग रामनामें श्री बोलवा रे ॥२॥
त्रिकांड वेदू वदला भला रे । तो अर्थ पाहे जो तो भला रे ।
स्वधर्म कर्मीं पण शोभला रे । वेदांत सिद्धांत तो लाभला रे ॥३॥
विवर्त माया विवरी सुटा रे । रिपुषष्ट यातें आधीं कुटा रे ।
शुकादिकांचें सुख तें लुटा रे । मग रामनामें टाळी पिटा रे ॥४॥
श्रीराममंत्रें निरसी भवाला । निरंतरीं ध्यास मनीं भवाला ।
जयवात पद्‍मी गर्वोद्भवाला । आधार पुष्टी सज्जनोद्भवाला ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP