चक्रव्यूह कथा - प्रसंग दुसरा

श्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.


श्री परेशाये णमा : श्रीकृष्णायेन्मा :

द्रोणे केलें नीर्वाण : धगधगीत काडिले दोन बाण : घ्यावया प्राण : भीमसेनाचा : ॥१३॥
ते देखिलें पंडुसुतें : मग धावीनला वेग करून बहुते : हाणीतला गदाघाते : द्रोणाचार्या तो : ॥१४॥
ते देखोनी द्रोण गुरू : भीमे उचलिला करू : तंव सांडोनि रहिवरू : द्रोण गेला ॥१५॥
घोडे आणी सारथी : चुर्ण केले हो क्षीती : तव कौरवि बहुती : हाणीतला भीमसेन ॥१६॥
द्रोण हाणी बाण त्याचे : तव सैल्ये हाणीतीला गदाघातें : शस्त्रें वर्सती बहुतें । तीये वेळी : ॥१७॥
कर्ण आणि आस्वस्थामा : हे हाणते जाले भीमा ॥ भीमाने हाणितीला सुसर्मा : तो धरणीवरी पाडिला :॥१८॥
मग भीमे हाणीतीला तीयेवेळी : कौरव मीळोनी सकळी : मुर्छना आलि तियेवेळीं : तवं विरराज पाव पा : ॥१९॥
ते धर्मनकुळें देखिलें : तव साहादेवे म्हणतीलें : कौरवि भीमाते वेढिलें : तुम्ही काये पाहाता ॥२०॥
द्रोपद म्हणे तयासी । कैसें जावे सोडवयासी । कोन्हीही नाहीं तुम्हापासी : द्रोण धरील तुमतें : ॥२१॥
ऐसा करीती वीचारू : तव उठीला वरकोदरु : पुडिलाचा केला संव्हारु : येता जाला : ॥२२॥
आपुलीया सैन्यात आला : बहुत सर्वांगी खोचला : नोवक मुर्छागत जाला : मग टेकला ध्वजस्थांबासी : ॥२३॥
तेवेळी धर्म आला जवळी : बोलता जाला तये वेळी कौरवी केली येकवळी : हा स्रमला मज राखता : ॥२४॥
द्रोपद वैराट आला : (तव भींमु सावध जाला): म्हणती चक्रवीहुते रचिला : मग बोलीला कोंतिभोजु : ॥२५॥
दुस्टदुन्माचेनि हातें : मृत्य आसे द्रोणातें : द्रोपदें केलें यज्ञाते : जन्म तेथें जाला : ॥२६॥
तयांसी पुढा करू : चाला तयासी माऋ : आसां करीती वीचारू : तव बंदिजन अला : ॥२७॥
तेही केंला ब्रह्मावो : धर्मा तु सोमवंसीचा रावो : आसुराचा फेडिला ठावो : भीमआर्जुनाने । ॥२८॥
आजि भीमे बरवे केले : कौरवदळ संव्हारीलें : गुरूसी मानवीलें : पळविला आस्वस्थामा : ॥२९॥
गुऋ थोर मानवला : आतां तुम्हासी बोलावीले चला : सकळ कौरवभार कोपला : द्रोण भिडेल येकला तुम्हासी ॥३०॥
तया येकलेयावरी तुम्ही बहुती : तुम्ही संग्राम केला अती : सेवटी तेणें केली ख्याती : मारिले सैन्ये : ॥३१॥
ऐसें बंदीजनी सांगीतेलें : भीम म्हणे ठाकुर आले : द्रोणे बोलाविले : तरि येउ आता : ॥३२॥
मग धर्मासी पुसिले : तेणे भीमातें म्हणीतीलें : तेही चक्रवीहुते रचीनले : तुज भेदवैल कैसा : ॥३३॥
द्रोपद म्हणे धर्माते : जरि रिगुनीघु जाणेल त्यांते : नाहि तरी लज्जे करुनी प्राणाते : हा कवण पुर्शार्थ : ॥३४॥
पाहाता गंगानंदन : साच केला पण : दीधला प्राण : साभीमान : ॥३५॥
तयासी कराल उण : परि संव्हार करीन : शाहाकारी नाराऐण : दैत्ये कैसेन वधीले : ॥३६॥
ते म्हणती भीमसेना : तुम्हा चक्रवीहु भेदवेना : जाउ म्हणता संग्रामा रणा : प्राण द्यावया : ॥३७॥
ऐसा वीचार करीती : तवं बंदीजन येती : त पवाडे पढती : पांडवाचे ॥३८॥
ते म्हणती भीमासी : जरी न याल सांग्रामासी : हारी आली तुम्हासी : द्या आम्हा अज्ञा : ॥४९॥
मग भीमे म्हणीतीलें : कैसे शाकडें मांडिलें : आम्हासी कैवाड मांडले : बहुतापरी : ॥४०॥
ऐसे आईकोनि बोलणें : मग म्हणें आभीमन्ये : संग्रामि जिंतणे : भेदीन चक्रवीहु : ॥४१॥
आता काई बोलु बहुतें : मी भेदीन चक्रवीहुतें : उठिला वीकटबाहो त्वरिते : आला धर्मापासी : ॥४२॥
चक्रवीहु भेदीन आतां : मग जाला वीनवीता : आईका जी तातां : मज भेदता वेळ न लगे : ॥४३॥
ऐसे अभिमन्या बोले : तयासी धर्मे म्हणितीले : तु बाळ धाकुले :चक्रवीहु न भेदवे ॥४४॥
चक्रवीहु म्हणसी भेदु : तुज नव्हे धनुरयुध्यु : बाळा सांडी संदु छेदु : लागैल बोल पार्थाचा ॥४५॥
तो ह्मणें जि धर्मराजा : तुम्ही नेणा पराक्रम माझा : मी बोलतो पैजा : मार्ग जाणे चक्रवीहुचा ॥४६॥
ऐसे आभीमन्या बोलीला । मग धर्म आळंगीला : बहुतापरी सीकवीला परी ना आईके तो : ॥४७॥
यावरि म्हणे वरकोदरु : तु धाकुटे लेकरु : वाळला नाहीं जारू : मस्तकीचा ॥४८॥
तरि आईक पार्थसुता : आम्हि जवळ असतां : तुज संग्रामा पाठवीता : हासैल अर्जुन ॥४९॥
तु धाकुटे बाळ : तुझें पारखिलें नाही बळ : म्हणसी संव्हारीन दळ : कौरबाचें ॥५०॥
ऐसें बहुत सीकवीलें : परि ना आईक म्हणतीले : परि तु धाकुट मुले : नव्हेसी स्याहाणा ॥५१॥
अभीमन्या ह्मणें मी तुमचा कुमरु । परि सासाअर्जुनाचा अवतारु : आहो मी जाणे मार्गु : चक्रवीहुचा ॥५२॥
तुम्ही आईका एक वेवस्ता : मी सुभद्रेचा उदरी होता : तीसी जाली थोर वेथा : मग स्मरीला श्रीकृष्णनाथ ॥५३॥
तो त्वरीत पावला : सुभद्रेसी पुसता जाला : ते म्हने संग्रामा वा डोहोळा जाला : पुरवी स्वामी ॥५४॥
ती चक्रवीहुची कथा : जाला सुभद्रेसी सांगता तीची राहिली वेथां : मातेसी नीद्रा आलीं ॥५५॥
श्रीकृस्ण जाला सांगतां : आणि मि जालो होकारा देतां : जाणवले द्वारकेनाथा : पुढिले कथा न सांगें तीची तो ॥५६॥
तो जाणवे पाहे : तव मी होकारा देत आहे : मग वीस्मीत होये : श्रीकृष्णनाथु : ॥५७॥
मनी वीचारी द्वारकेराजा : तव गर्भीं देंखिल्या सह्स्त्रभुजा : म्हणे हा होय सासाअर्जुत राजा : त्याच्या भुजा छेदीन मी ॥५८॥
ते व्हेळी उपाय करी : सुद्रसेन घाली उदरी : भुजा छेदी मुरारी : राखी हारी दोण भुजा ॥५९॥
मग सुमद्र जागी होउन : हे पाहा पा भुजाची वळखण : मज सासाआर्जुनाची आंगवण : त्रीलोक्ये जिंतेन मी ॥६०॥
तरी चक्रवीहु भेदीता : मज नलगे घडि आतां । ऐसा जाला बोलेता : समस्तासी ॥६१॥
मग सकळ म्हणती : हे आली आम्हा प्रचीती : परी येक वीनंती : परि कोपती श्रीकृस्णनाथु ॥६२॥
अभीमन्या म्हणें तयासी : आम्ही जन्मलो सोमवंसी : हारी पतकरु कैसी : पुर्वजासी येईल उणे ॥६३॥
जळो जळो हे जीणे : क्षत्र धर्मासि येइल उणे : पा पस्येनीक मरणें : तेचि बरवे : ॥६४॥
पुत्र वुळी जन्म जाला  । माता पित्याने उछावो केला : म्हणती हा होईल भला : उधरील वंसातें ॥६५॥
अहो जन्मावे पुत्रपणें : आपेक्षा त्याचि पुरवणें : जळो जळो ऐसें जीणे : त्या पुत्राचे पै : ॥६६॥
मातापीत्याकारणें : नीक्षत्रि केली मेदिने : त्याची पढती पुराणे : तिही लोकी ॥६७॥
देवो तेतीस कोडी : पडिले होते बांदोडी : सर्व राक्षेस मारीले लक्षे क्रोडी : रामचंद्र ॥६८॥
मात पीतया पतनाकारणें : देव जिंतुनि अमृत आणने : ऐसी पुत्रपणाची पुराणे : पढती लोक ॥६९॥
धर्म म्हणे अभिमन्यासी: जाये पुसे सुमद्रेसी : आला नातेपासी : पुसावया ॥७०॥
तीये सीकवीला बहुतापरी : तो ना आईके कव्हणेपरी : मातेसी नमस्कार करी : आला सभेसे ॥७१॥
मग म्हणे धर्मराजा : यासी अज्ञा द्यावी मज : आभीमन्या म्हणे प्रताप पाहावा माझा : क्षेत्रें धर्माचा ॥७२॥
मग भीमसेन नमस्कारीला : नकुळ शाहादेवासी भेटला : मग रणवटु बांधीला : आभीमन्यासी : ॥७३॥
वीप्रासी दान देउन : रथी चढला अभीमन्या : पवाडे पडती बंदीजन : आभीमान्याचे ॥७४॥
सकळ सैन्य पालाणीले : घावो नीस्याणा दिधले : रणतुराचें गर्जर जाले : थोर द्खा : ॥७५॥
पुढें असे अभीमन्य : मधी धर्माते घालुन : मागां आसे भीमसेन : चालीयला : ॥७६॥
ऐसे रणभुमीसी आले : बंदीजण पुडा गेले : ते द्रोणासी सांगतें जाले : चरीत्र अभीमन्याचें ॥७७॥
आर्जुनाचा कुमरू : सासाआर्जुनाचा अवतारु : चक्रवीहुचा जाणे मार्गुं : म्हणौनि रनवटु बांधिला ॥७८॥
मग म्हणे म्हणे द्रोणगुरू : ते धाकुटे लेंकरू : चक्रवीहुचा मार्गु : केवी जाणे ॥७९॥
ऐसा बोले गुऋ : तव आला वरकोदरु पुडा होता कौरवभारु : तेथें संग्राम कैसा जाला ॥८०॥
मग उतरुनी चरणचारी : गदा घेतली करी : कौरवदळ संव्हारी : सैन्यासी पळ सुटला ॥८१॥
दारवठा होता गुरू : तेथें राहीला दळभारू : पाठि लागतें आला वरकोदरू : मग द्रोण पाचारीला : ॥८२॥
राहे राहे रे भीमसेना : म्हणौनि करी संधाना : बाणी व्यापीले गगना : ते देखिले पंडुसुते ॥८३॥छ॥
मग धनुस घेतलें करी : तोडी बाणाच्या सरी : गुरू वरसे शस्त्राधारी : तो सावरी वरकोदरू ॥८४॥
द्रोणाचार्यांचा मारू : ओ लोहाचा माहापुरू : तेणें खोचला वरकोदरू : मग रथावरून उतरला ॥८५॥
मग गदा घेतली करी : धावीनला द्रोणावरी : भवंडुनी हाणावें जरी : तव कृपाचार्यां पाचारीला ॥८६॥
न सावरेचि आला : आमीता बाणी हाणीतीला : मुदगल आंगी वाजिनला : वीकर्ण देखा ॥८७॥
तवं कौरवदळी : वीर होते माहाबळी : तेहि हाणीतला सकळी : तो बळि भीमसेन ॥८८॥
मग सोडोनी द्रोणातें : त्यासी हाणि गदाघाते : संव्हारूनी तयातें : कृपाचार्याते हाणें ॥८९॥
तो रथ चुर्ण केंला : कृपाचार्या पळोनि गेला : तव माहाबळी भीम हाणीतिला : मुदगले करूनी ॥९०॥
सोमदंते माहाबळे : भीम हाणीतीला त्रिसुळे : हुडा आड होत्ति दळे : शस्त्रेधारी वरूसती ॥९१॥
चक्रवीहचा द्वारी : कर्णं हाणे भारी वीकर्णं धनुशे घेतलें करी : हाणें पाचा बाणी ॥९२॥
तीयेवेळी जईंद्रथे : हाणीतला गदाघाते : तव होण वीर चक्रघातें : पंडुसुते हाणीतीला ॥९३॥
तव अचार्या माहाविरी : हाणीतिला माहामारी : भीम तयाते मारी : तव द्रोण खवळळा ॥९४॥
अचार्या म्हणे चक्रवीहुचा मारू : नेणें हा वरकोदरू : उत्तरोनी कोणी मारू : चक्रवीहु भेदवेना : ॥९५॥
कृपाचार्चा कृतवर्मा : हे हाणते जाले भीमसेना : भीम न ढळे स्वधर्मा : तीयेवेळी : ॥९६॥
तो येकला ते बहुते : शस्त्रें वर्सती आमित्ये : ते आभीमन्या देखते : मग वीनवी धर्मांसी ॥९७॥
मज आज्ञा दीजे घर्मा : मीं सोडवीन भीमा : जाईल त्याचा आत्मा : मग काई कराल : ॥९८॥
धर्म म्हणे आभीमन्यासी : तु भीमास सोडविसी : हा नीर्धार असे तुझा मानसी : जरी भेदिसी चक्रवीहुते ॥९९॥
अभीमन्या म्हणे पाहा क्षातें : चक्रवीहु भेदीन क्षिणातें : भीम सोडवीन दावीन प्रचीतें : कौरवासी : ॥२००॥

आज्ञा दीधली अभिमन्यासी : तो नीघाला वेगेसी : पुडा कथा वर्तंली कैसी : ते सांगे रे विष्णुदासा नामया ॥१॥
चक्रविहु आईकती : युध्याची फिटे भ्रांती : सुरनरा फुराण येती : माहावीरासी ॥२॥
जन्मोजया प्रस्णे करी : वैसंपायना आवधारी : आभीमन्या वीहुचक्रावरी : कैसा चालीला ॥३॥
मग बोले वैसंपायन । आता पुडा आईका चित देउन : केसे केले नीर्वाण :ते आईक आतां ॥४॥

॥ प्रसंग दुसरा ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP