मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे|
सत्कवींची काव्ये भाग ६

सत्कवींची काव्ये भाग ६

देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.


जय देवी विष्णुकांते, महालक्ष्मी ग माते ।
आरती ओवाळीन तुज विज्ञानसरिते ॥ध्रु.॥
मर्दिला कोल्हासुर, ख्याती केली कीं थोर ।
श्रीलक्ष्मी नाम तुझें, दैत्य कापती फार ॥१॥
धन्य तें कोलापुर. धन्य तेथींचे नर ।
सकळही मुक्त होती तुजला पाहतां सत्वर ॥२॥
रहिवास कोलापुरीं पंचगंगेच्या तीरीं ।
सुविशाल सिंहासन, विराजसी तयावरी ॥३॥
मागणें हेंचि माये, आतां दाखवी पाय ।
उशीर नको लावूं, दास तुझा वाट पाहे ॥४॥

सुखसदने, शशिवदने, अंबे, मृगनयने ।
गजगमने, सुरनमने, कोल्हासुरमथने ॥
सुरवर वर्षति सुमनें करुनीया नमनें ।
भयहरणे, सुखकरणे, सुंदरि शिवरमणे ॥१॥
जय देवी जय देवी जय वो जय अंबे ।
कोल्हापुरस्वामिणी, तुज वो जगदंबे ॥ध्रु.॥

मृगमदमिश्रित केशर शोभे कपाळीं  ।
कुंचित केश विराजित मुगुटांतुन भाळीं ॥
रत्नजडित सुंदर अंगीं कांचोळी ।
चिद्‌गगनाचा गाभा अंबा वेल्हाळी ॥२॥
कंठीं विलसित सगुण मुक्ताविशेषें ।
पीत पितांबर सुंदर कासियला कासे ॥
कटितटिं कांचीकिंकिणि ध्वनी मंजुळ भासे ।
पदकमळलावण्यें अंबा शोभतसे ॥३॥

झळ झळ झळ झळ झळकतिं तानवडें कर्णीं ।
तेजा लोपुनि गेले रवि-शशि निजकिरणीं ॥
ब्रह्मा-हरि-हर सकळिक नेणति तव करणी ।
अद‌भुत लीला लिहितां, न पुरे हो धणी ॥४॥

अष्टहि भूजा सुंदर, शोभतसे शोभा ।
झग झग झग झगझगीत लावण्यगाभा ॥
म्हग म्हग म्हग म्हगम्हगीर सुमनांची शोभा ।
त्र्यंबक मधुकर होउनि वर्णितसे अंबा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP