मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे|
जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग १

जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग १

देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.


प्रतिपच्चंद्ररेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।
शंभुछत्रपतेर्मुद्रा रामसूनोर्विराजते ॥

विष्णवादि देव जया नमिती । जो नाशूनि विघ्नतती ।
भक्तांसि दे भुक्ति-मुक्ती । त्या गणपतीस नमन असो ॥१॥
जो प्रल्हादाचे स्तंभातून । घोररूपें प्रकटून ।
घे हिरण्यकशिपूचे प्राण । त्या नृसिंहा नमन असो ॥२॥
जी स्ववासें कोल्हापूर । शोभवी. शीघ्र वधी कोल्हासुर ।
राखी देवसंघ, मुनिवर । त्या महालक्ष्मीस नमन असो ॥३॥
जो शिवरुप घोरतर । नाशी दक्षाचा अध्वर ।
तेथे वधी विष्णवाद्यमर । त्या वीरभद्रास नमन असो ॥४॥
आणि ज्या सूर्यादि देवव्यक्ती । पार्वत्यादि सकल शक्ती ।
त्याही नमितो व्हावया शक्ती । मज कवित्वादिकीं ॥५॥

ज्याने भारतपर्वांवर । केल्या ओव्या सुंदर ।
जो भगवद्‌भक्तवर । त्या मुक्तेश्वरा नमन असो ॥१२॥
जे जे ओव्या प्राकृत । करते झाले बहुत ।
श्रीधरादिक संत । त्यांस माझे नमन असो ॥१३॥

करवीरमाहात्म्य असे संस्कृत । त्याच्या आधारें मी प्राकृत ।
तेंच करीन, परी समर्थ । लक्ष्मीकृपा जाहलिया ॥१५॥
मुक्याच्या मुखें ग्रंथ वदवी । पंगूतें गिरि-उल्लंखन करवी ।
ऐसी कृपा जियेची बरवी । तीतें पुन: नमितसे ॥१६॥

जे नाशी पापांचा निकर । दक्षिण काशी करवीर ।
ते अनर्थातें सत्वर । निरसून रक्षो जगातें ॥२२॥
जी भवरोगाची नाशक । मंगलाची वृद्धिकारक ।
पवित्र आणि पापनाशक । करवीर ही कामधेनू ॥२३॥
तिचें जें कथारूप दुग्ध । अति गोड सुखप्रद ।
जें उदार आणि नाशी मद । त्यातें सेवा सर्व हो ॥२४॥

करवीरमाहात्म्य वरद ग्रंथ । याचा कर्ता रमानाथ ।
दाजी जोशीराय हें निमित्त । करोनि ग्रंथ वदविला ॥३५॥
या ग्रंथास वरदान । महालक्ष्मीनें दिधले आपण ।
जे पठण श्रवण करिती प्रतिदिन । ज्ञानप्राप्ती होय तयां ॥३६॥
करवीरमाहात्म्य ग्रंथ सुंदर । हें बहात्तर खणांचे गोपुर ।
लक्ष्मीसह रमावर । क्रीडा करी तयावरी ॥४०॥
करवीरमाहात्म्य ग्रंथ सागर । त्यातील अर्थ हे अगाध नीर ।
ते तरावया ही दृढतर । ग्रंथरूप नौका केली असे ॥४१॥
पद्मपुराण सरित्पती । त्यात करवीरखंड शुक्ती ।
करवीरमाहात्म्याची स्थिती । तयामाजी कीटापरी ॥४२॥
त्यातील अर्थ मौक्तिक । पावोत हे प्राकृत लोक ।
त्यांस व्हावया अनंत सुख । हा ग्रंथ निर्माण केला असे ॥४३॥
या ओव्या मौक्तिकांची माला । अर्पिली श्रीच्या पदकमलां ।
तेणें संतुष्ट होत कमला । करवीरनिवासिनी ॥४५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP